Thursday, March 13, 2025
Homeराजकीयकाँग्रेसने एससी, एसटी, ओबीसींना पुढे जाऊ दिले नाही; PM मोदींचा आरोप

काँग्रेसने एससी, एसटी, ओबीसींना पुढे जाऊ दिले नाही; PM मोदींचा आरोप

वर्धा | Wardha

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ध्यात विविध योजना आणि प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीकेचे बाण डागले आहे.

- Advertisement -

एससी, एसटी, ओबीसी समाजातील मंडळींकडे मागील सरकारांनी दुर्लक्ष केले. काँग्रेसने या घटकांना जाणूनबुजून मागे ठेवलं. मागासवर्गीय विरोधी मानसिकतेला आम्ही मागे टाकले. विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक फायदा एससी एसटी ओबीसीला मिळाला आहे. महाविकास आघाडीने कापसाला शेतकऱ्यांची ताकद बनवण्यापेक्षा त्यांची उपेक्षा केली. मविआने केवळ भ्रष्टाचार केला, असे गंभीर आरोपही पंतप्रधान मोदींनी केला.

आज जी काँग्रेस आहे, ती गांधींची नाही. आजच्या कांग्रेसमध्ये देशभक्तीची आत्मा मेली आहे. आजच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचं भूत आहे. आज काँग्रेसच्य़ा लोकांची भाषा पाहा. परदेशात जाऊन त्यांचे देशविरोधी अजेंडे सुरू आहेत. समाजाला तोडणं, देशात फूट पाडण्यावर बोलत असतात. तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्षली लोक काँग्रेस चालवत आहे. देशातील सर्वात भ्रष्ट आणि बेईमान पार्टी काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब हे काँग्रेसचं शाही कुटुंब आहे. ज्या पार्टीत आपल्या अस्था असेल ती पार्टी गणपती पूजेचा विरोध करणार नाही. पण आजच्या काँग्रेसला गणपती पूजेला विरोध आहे, असा घणाघातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...