Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमहिलेच्या खात्यातून ९० हजार लंपास

महिलेच्या खात्यातून ९० हजार लंपास

औरंगाबाद – aurangabad

एकीकडे केंद्र सरकारकडून (Online payment system) ऑनलाईन पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे याच प्रणालीत (Cyber ​​fraud) सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सीम कार्ड बंद होणार असल्याची थाप मारून एका महिलेच्या बँक खात्यावरून सायबर चोराने ८६ हजार ८३३ रुपये लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात क्रांती चौक (police) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

समर्थनगर येथील मानस अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका महिलेला ८१०२१२०६२१ आणि ७०७४०६१०६६ या क्रमांकावरून लागोपाठ फोन आले. मोबाइलवरून बोलणाऱ्यांनी संबंधित महिलेला तुमचा बीएसएनएलचा सिम कार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. सिम कार्ड बंद होऊ नये. यासाठी काही सायबर चोरांनी तांत्रिक माहिती सांगितली. महिलेला ही माहिती भरता आली नाही. सायबर चोरांनी तिला एनीडेस्क नावाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याचे सांगितले. या एनीडेस्कचा नंबर घेऊन चोरांनी महिलेच्या खात्यावरून ८६ हजार ८३३ रुपये लंपास केले. ही घटना २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.२१ वाजेच्या दरम्यान घडली.

कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि स्मार्ट मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी आधारकार्ड, पॅन कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे बँक अकाऊंट बंद होईल, असा धाक दाखवून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना फसवल्याचे समोर आले आहे. बँक अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांशी संपर्क साधत डेबिट, क्रेडिट कार्डविषयी गोपनीय माहिती मिळवली जात आहे. गुगल पे, फोन पे रिवॉर्डसचे आमिष दाखवून विश्वास संपादन करत चोरट्यांनी आजवर अनेकांना फसवले आहे. वारंवार सायबर गुन्ह्यांच्या बातम्या समोर येत असताना देखील लोक आमिषाला आणि फेक कॉलला बळी पडत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या