नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेबुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (12th Exams) परीक्षांचा निकाल (result) आज ऑनलाईन (Online today) जाहीर (Announced) करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयातील नियमीत विद्यार्थ्यांचा एकुण निकाल 93.03 टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल 98.12 टक्के लागला आहे.
नंदुरबार जिल्हयात एकुण 16 हजार 525 नियमीत विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी 16 हजार 400 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील 15 हजार 257 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे जिल्हयाचा एकुण निकाल 93.03 टक्के लागला.
विज्ञान शाखेचा 98.12 टक्के निकाल
नंदुरबार जिल्हयात विज्ञान शाखेत 8 हजार 929 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 8 हजार 762 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 4 हजार 666 विद्यार्थी व 4 हजार 96 विद्यार्थिनींचा समावेश आहे. विज्ञान शाखेचा निकाल 98.12 टक्के लागला.
कला शाखेचा 85.38 टक्के निकाल
नंदुरबार जिल्हयात कला शाखेत 6 हजार 410 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 5 हजार 473 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 3 हजार 6 विद्यार्थी व 2 हजार 467 विद्यार्थिनींचा समावेश आहे. कला शाखेचा निकाल 85.38 टक्के लागला.
वाणिज्य शाखेचा
96.96 टक्के निकाल
नंदुरबार जिल्हयात वाणिज्य शाखेत 891 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 864 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 490 विद्यार्थी व 374 विद्यार्थिनींचा समावेश आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 96.96 टक्के लागला.
व्होकेशनल अभ्यासक्रमचा 93.33 टक्के निकाल
नंदुरबार व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी 150 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 120 विद्यार्थी व 20 विद्यार्थिनींचा समावेश आहे. व्होकेशनल अभ्यासक्रमाचा निकाल 93.33 टक्के लागला.
तांत्रिक विज्ञानचा निकाल 90 टक्के
नंदुरबार जिल्हयात तांत्रिक विज्ञान अभ्यासक्रमासाठी 20 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तांत्रिक विज्ञानचा निकाल 90 टक्के लागला.
विद्यार्थिनींची टक्केवारी 94.84
नंदुरबार जिल्हयात 16 हजार 625 विद्यार्थ्यांमध्ये 7 हजार 384 विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी 7 हजार 3 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे 94.84 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्य आहेत.
90.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
जिल्हयात 9 हजार 241 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 8 हजार 403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे 90.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.