Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशउत्तर भारतात उष्णतेचा कहर! UP, बिहारमध्ये उष्माघाताने ३ दिवसांत ९८ जणांचा मृत्यू......

उत्तर भारतात उष्णतेचा कहर! UP, बिहारमध्ये उष्माघाताने ३ दिवसांत ९८ जणांचा मृत्यू… रेड अलर्ट जारी

दिल्ली | Delhi

मान्सून दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात बिपरजॉयने धुमाकूळ घातला. या चक्रीवादळाचा गुजरातसह राजस्थानला फटका बसला. दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. प्रचंड उष्णतेमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किमान ९८ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात फक्त उत्तर प्रदेशात ५४ तर बिहारमध्ये ४४ मृत्यू झाले आहेत.

- Advertisement -

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत, मात्र वाढळेली उष्णता हे देखील एक कारण आहे. तसेच भीषण उष्णतेमुळ रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढतच जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रंचड उष्णता वाढली आहे, बऱ्याच भागात तापमान ४० डिग्रीच्या पुढे जाताना दिसून येत आहे.

Ameesha Patel : अमिषा पटेलवर आली तोंड लपवण्याची वेळ, जाणून घ्या नेमकं प्रकरण

मृतांची अचानक वाढलेली संख्या आणि रुग्णांना ताप, श्वास घेताना त्रास होणे आणि इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात गर्दी झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवरही ताण निर्माण झाला आहे. रुग्णालयात स्ट्रेचरी कमतरता असल्याने अनेक कर्मचारी रुग्णांना खांद्यावरून घेऊन जात आहेत.

उत्तरप्रदेशप्रमाणेच बिहारमध्येही परिस्थिती गंभीर आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात किमान १८ ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट तर चार ठिकाणी उष्णतेची लाट आली असल्याची माहिती आहे. ४४ मृत्यूंपैकी ३५ लोकांचा मृत्यू राजधानी पाटणामध्ये झाल आहे, त्यापैकी १९ रुग्णांचा नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

Adipurush : ‘आदिपुरुष’ सिनेमातले ‘ते’ वादग्रस्त डायलॉग बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये तापमानाचा पारा ४४.७ डिग्री सेल्सियस इतका नोंद झालाय. या पार्श्वभूमीवर पटना आणि इतर जिल्ह्यात २४ जूनपर्यंत शाळा बंद केल्या आहेत. तर हवामान विभागाने रविवार आणि सोमवारी हाय अलर्ट जारी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या