Friday, May 17, 2024
Homeनगर'मानवता जीवन'कडून जुलिया कोविड हॉस्पिटलला मदत

‘मानवता जीवन’कडून जुलिया कोविड हॉस्पिटलला मदत

श्रीरामपूर | प्रतिनिधी

येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रिडा या क्षेत्रता अग्रेसर असलेली मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्थेने करोनाच्या काळात जनजागृती, मास्क, सॅनिटायझर, किराणा ‘किट व धान्य इत्यादींचे सामाजिक कार्य म्हणून वाटप करण्यात आले.

- Advertisement -

जामखेड येथील डॉ. रवि आरोळे यांनी त्यांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर मोफत उपचार करून अनेक रूग्ण बरे केले आहेत. डॉ. रवि आरोळे यांनी रुग्णांना मोफत नाष्टा, जेवण, मोफत उपचार केले. त्यांच्या या समाजसेवेबद्दल त्यांच्या जुलिया कोविड हॉस्पिटल, जामखेडला मानवता जीवन कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने १५ हजार ५०० रूपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल साळवे यांनी दिली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष दादासाहेब निघुट कोषाध्यक्ष इंजि. अविनाश काळे, संस्थेचे मार्गदर्शक उद्योजक सुनिल कर्जतकर, विलास गायकवाड पास्टर राजेश कर्डक, कार्याध्यक्ष प्रा. नानासाहेब गांगड, प्रा. विजय साळवे, राज्य संपर्क प्रमुख अॅड. प्रमोद सगळगिळे, जिल्हा संघटक जितेंद्र पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख मुख्याध्यापक अजय शिंदे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या