Friday, May 3, 2024
Homeनगरबीओटीवर जागा विकसीत करण्यासाठी पुन्हा सरसावली झेडपी

बीओटीवर जागा विकसीत करण्यासाठी पुन्हा सरसावली झेडपी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद मालकीच्या कोट्यावधी रुपयांचा जागा सध्या जिल्हाभर मोकळ्या पडून आहेत. तर काही ठिकाणी त्या जागांवर अतिक्रमण झालेले आहेत. शासनाकडे बीओटी (बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा) या तत्वावर या जागाचा विकास करण्यासाठी परवानगी मागितल्यास ती वेळखाऊ प्रक्रिया होते. यामुळे जिल्हा परिषद पातळीवर यावर मार्ग काढण्यासाठी पुढील मंगळवारी सदस्यांची झेडपीत स्वतंत्र बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी बीओटीवरील जागांचा विकासाचा विषयावर मार्ग काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

शेवगाव शहरातील बीओटीच्या प्रकल्पावरून सदस्य हर्षदा काकडे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. शेवगाव शहरातील कोट्यावधी रुपयांच्या प्राथमिक शाळेच्या जागेचा बीओटीच्या माध्यमातून विकास करण्यासाठी प्रस्ताव दिल्यानंतरही त्यावर अनेक वर्षापासून कार्यवाही न झाल्याने सदस्य काकडे चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. या विषयावर बांधकाम विभाग दक्षिणचे कार्यकारी अभियंता जोशी यांना माहिती देता आली नाही.

यामुळे अखेर अर्थ समितीच सभापती सुनील गडाख यांनी या विषयात हस्तक्षेप करत पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या जागा विकसीत करणे आणि बीओटीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या बैठकीची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

घर भाडे आकरणीची होणार चौकशी

जिल्ह्यात 15 हजारांहून जिल्हा परिषदेचे कर्मचार्‍यांना घरभाडे भत्ता सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी हे कर्मचारी राहातात, त्या ठिकाणी ग्रामपंचायतींकडून आकारण्यात येणारे घर भाडे हे व्यावसायिक पध्दतीने होत नाही. यामुळे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग ज्या ज्या गावात शासकीय कर्मचार्‍यांना घरे भाडेतत्वावर दिलेली आहेत. त्यांची चौकशी करून योग्य पध्दतीने त्यांच्याकडून या पुढे व्यावसायिक पध्दतीने घरे भाडे आकरणी करण्यात येइल, असेे आश्वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

अन् वाकचौरे यांच्या डोळ्यात पाणी

जिल्हा परिषदेच्या दिवंगत सदस्यांच्या आठवणी भाजपचे प्रतोद जालींदर वाकचौरे भावक झाले. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य मंडळातील तीन सदस्यांना करोनाने हिरावून घेतले. त्यांच्या आठवणींना उजाळा देतांना वाकचौरे यांना अश्रु अनावर झाले. करोनाने अनेक कुटूंबाचे जीवन बदलून टाकले. अनेक जवळच्या माणसांना आपण मुकलो. यामुळे करोनावर लसीकरण हाच एकमेंव उपाय सुरू आरोग्य खात्याने गांर्भीयाने लसीकरण करून घ्यावे. अकोले तालुक्यात ठाकर आणि महादेव कोळी समाज करोना लस घेण्यास तयार नाहीत. या समाजाचे प्रबोधन करून त्यांचे लसीरकणाची मागणी त्यांनी यावेळी केली.

नवले कविता आणि देशमुखांचे फटके

सभेत श्रीरामपूरचे सदस्य शरद नवले यांनी जिल्हा परिषद सदस्यांसह सभेला हजर असणार्‍या पत्रकारांवर दोन स्वतंत्र कविता सादर केल्या. तर अकोल्यातील राष्ट्रवादीचे सदस्य रमेश देशमुख यांनी त्यांच्या शैलीत प्रशासनाच्या उत्तरांवर बोट ठेवत त्यांच्या चुकासमोर आणल्या. यावेळी सभागृहात त्यांची अनेकांशी शाब्दीक चकमक ही झाली. मात्र, हसत खेळत त्यांनी सभेचा आनंद घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या