Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुखांंना ईडीचे तिसरे समन्स

अनिल देशमुखांंना ईडीचे तिसरे समन्स

मुंबई / Mumbai – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसरे समन्स बजावले आहे. ईडीने देशमुख यांना उद्या (5 जुलै) सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

अनिल देशमुख या आधी दोन समन्म मिळूनही ईडीच्या (ED) कार्यालयात हजर राहिले नव्हते. माझे वय झाले असून मला काही आजार असल्याने आपण ईडीच्या कार्यालयात येऊ शकणार नाही, असे देशमुख यांनी ईडीला कळवले होते. इतकेच नाही, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी चौकशीसाठी तयार आहे, असेही देशमुख यांनी ईडीला कळवले होते.

- Advertisement -

ईडीने देशमुख यांना 25 तारखेला पहिले समन्स बजावले होते. तर दुसर्‍या समन्सनंतर त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहिले होते. दरम्यान अनिल देखमुख हे आता कार्टाच्या पर्यायाची चाचपणी करत आहेत. कोर्टाकडून आपल्याला नक्की दिलासा मिळेल असे त्यांना वाटत आहे. मात्र, देशमुख यांनी ईडीला दिलेली हजर न होण्याची कारणे ईडीने बाजूला सारत तिसरे समन्स बजावले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी माजी पोलिस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील ईडीने चौकशी केली होती. अनिल देशमुखांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच देशमुख यांच्यासह संबंधितांच्या घरावर ईडीने (25 जून) छापे टाकले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या