Friday, May 17, 2024
Homeनगरटाकळीभान टेलटँकच्या कालव्याच्या मोरीत एकाचा मृत्यू

टाकळीभान टेलटँकच्या कालव्याच्या मोरीत एकाचा मृत्यू

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान टेलटँकच्या कालव्याच्या मोरीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय पाईपच्या गजाला अडकल्याने मोरीतच मृत झाला. सोबतीला असलेल्या तरुणांनी तो बराचवेळ बाहेर न आल्याने आरडाओरड केल्याने दुसर्‍या तरुणांनी मोरीत घुसून त्याचा शोध घेतला असता तो मृतावस्थेत आढळून आला.

- Advertisement -

टाकळीभान येथील लक्ष्मीवाडी परीसरातील रमेश देवराम सुरसे (वय 25) हा दोन सहकार्‍यांसोबत टाकळीभान टेलटँकवर मासेमारीला गेला होता. टेलटँकमधून कालव्याला पाणी सोडण्यासाठी सुमारे 200 फूट लांबीच्या सिमेंट पाईपची मोरी आहे. या मोरीत मासे मिळत असल्याने हे तरुण या मोरीत घुसून मासेमारी करीत होते. यापुर्वीही त्यांनी मासेमारीसाठी या मोरीचा वापर केला होता. काल रविवारीही मयत रमेश देवराम सुरसे हा दोन मित्रांसमवेत मासेमारीसाठी गेला होता.

तो या मोरीत बराच आतपर्यंत गेला होता. त्याचे दोन साथीदार मोरीच्या तोंडापाशी त्याची वाट पहात होते. बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने त्या साथीदारांनी आरडाओरड केल्याने ही वार्ता सर्वत्र पसरली. जलसंपदा विभाग, पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. तातडीने मदत कार्य हाती घेऊन दुसर्‍या तरुणाला मोरीत पाठवण्यात आले. सुमारे 50 ते साठ फूट खोलवर गेल्यावर रमेशचा मृतदेह आढळून आला. मोरीच्या पाईपच्या लोखंडी गजात तो अडकला होता. व त्यातच तो मृत झाला होता. त्याचा मृतदेह मोरीबाहेर काढून पोलीस हेड कॉन्स्टेबल आयुब शेख यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या