Friday, May 3, 2024
Homeदेश विदेश5 + वर्षांच्या मुलांसाठी कोरोना लस

5 + वर्षांच्या मुलांसाठी कोरोना लस

मुंबई :

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील मुलांसाठी चांगली बातमी आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या चाचणीला परवानगी दिली आहे. या लसीची चाचणी देशभरात १० ठिकाणी केली जाणार आहे. 5 ते 18 वर्षे वयाच्या मुलांना क्लिनिकल चाचणी मंजुरी देण्यात आली आहे. मुलांसाठी असणारी ही चौथी लस आहे.

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

बायोलॉजिकल ई लिमिटेडची ‘कार्बेव्हॅक्स’ लस सप्टेंबरच्या अखेरीस भारतात लाँच केली जाऊ शकते. कार्बाव्हॅक्स ही स्पाइक प्रोटीनपासून बनलेली पहिली कोरोना लस असून ही देशातील सर्वात स्वस्त किमतीत उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने ‘कार्बेव्हॅक्स’ लसीच्या ३० कोटी डोसच्या पुरवठ्यासाठी १५०० कोटी रुपयांचे आगाऊ पैसे देखील दिले आहेत.

यापुर्वी या लसींना परवानगी

  • 1) DCGI ने देशात विकसित केलेल्या Zydus Cadila लस, Zycov-D च्या आणीबाणीच्या वापरास मंजुरी दिली होती.

  • 2)सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) कोव्हॅक्सला 2 ते 17 वर्षांच्या मुलांवर टप्पा II आणि III च्या चाचण्यांना मंजुरी मिळाली आहे.

  • 3) l 5 ते 18 वर्षे वयाच्या मुलांमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या