Friday, May 3, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! चुकले आमचे काही...

Photo Gallery : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! चुकले आमचे काही तर क्षमा असावी!!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज सकाळपासूनच शहरातील वातावरण भक्तीमय बनले होते. गणरायाच्या पूजनासाठी घरांमध्ये व सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लगबग दिसून आली. यंदा गणेश विसर्जनास परवानगी नसल्याने मूर्ती संकलन केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरली…

- Advertisement -

महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे संकलन करण्यात आले. गोदाकाठ परिसर, सोमेश्वर धबधबा परिसर, रामकुंड, बापू पूल, नाशिकरोड यांसह शहरातील विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांसोबतच कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

निर्माल्य विसर्जनासाठीही पालिका व सामाजिक संस्थांनी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. बहुतांश भाविकांनी घरातच कुंड साकारत मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन केल्याचे दिसून आले.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिस व संबंधित यंत्रणांनी केलेल्या आवाहनाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला. महापालिकेच्या वतीने मूर्ती विसर्जनासाठी ‘टँक ऑन व्हील’ ही संकल्पना राबविण्यात आली. विविध सोसायट्यांमधील सदस्यांनी एकत्रित येत विसर्जन केंद्रांवर मूर्ती दान केल्या.

शहरात लागू करण्यात आलेली कडक नियमावली, हाती उरलेला केवळ मूर्ती दान करण्याचा पर्याय यामुळे नागरीकांनी घरगुती विसर्जनावर भर दिल्याचे पाहायला मिळाले. यंदा मूर्ती दानाचा पर्याय हाती असल्याने भाविकांनी कुटुंबातील एक किंवा दोन प्रतिनिधींच्या उपस्थितीत मूर्ती दान केल्या. परंतु सायंकाळच्या सुमारास गोदाकाठी मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या