Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकाळजी घ्या : धुळे, जळगावासह या जिल्ह्यात रेड अलर्ट

काळजी घ्या : धुळे, जळगावासह या जिल्ह्यात रेड अलर्ट

गुलाब चक्रीवादळ (gulab cyclone)हे बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपरट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा (rain) इशारा देण्यात आला आहे.

धुळे, जळगाव, चंद्रपुरात, पालघर, ठाणे, रायगड हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात ऑरेंज आणि यलो अलर्ज देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील “गुलाब चक्रिवाद़ळ” गोपालपूर- १४०कि मी, कलिंगपटनम पासून १९०कि मी असून, आज मध्यरात्री पर्यंत ते गोपालपूर-कलिंगपटनम मध्ये धडकण्याची शक्यता. वाऱ्यांचा वेग ताशी ७५-८५कि मी,व गस्टींग ताशी 95कि मी असेल अशी माहिती कुलाबा वेधशाळेतील शुभांगी भुते यांनी दिली आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुलाब हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झालं आहे.आंध्र प्रदेश, द ओरिसा किनारापट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. 26 सप्टेंबर म्हणजेच रविवारी संध्याकाळी आंध्र प्रदेश, ओरीसा किनारपट्टी या ठिकाणी धडकू शकतं. महाराष्ट्रासाठी पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे असं ट्विट के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

रविवारी मध्यरात्रीपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ आज सायंकाळपर्यंत कलिंगपट्नम आणि गोपालपूरम याठिकाणी धडकण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या