Friday, May 3, 2024
Homeजळगावहागणदारी मुक्त योजना कागदावरच

हागणदारी मुक्त योजना कागदावरच

बोदवड Bodwad। प्रतिनिधी

तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींना स्वच्छ व हागणदारीमुक्त (Hagandari Mukta Yojana) कागदपत्रांवर (on paper only) ती दाखवण्यात येतात, परंतु प्रत्यक्षामध्ये 38 पैकी एकही ग्रामपंचायत (Gram Panchayat) हागणदारीमुक्त नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

- Advertisement -

गावातील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधकाम करीना करता अंदाजित कोट्यवधी रूपये शासनाकडून खर्च करण्यात आला; परंतु या शासनाचा निधी हा निकृष्ट दर्जाचे शौचालय व तर काही शौचालय न बांधतात पैसे काढण्याचे प्रकार समोर येत असून सुद्धा शासन दरबारी हागणदारीमुक्तचा नारा संबंधित कर्मचारी लावत असतात हागणदारीमुक्त संकल्पनाही गावामध्ये स्वच्छता राखण्याकरता शासनाकडून केलेला उत्तम अशी योजना सुरू असून त्यामध्ये 2 हजार रुपये घेऊन वैयक्तिक शौचालय न बांधताच 12 हजार रुपये वैयक्तिक शौचालयाचे लाटण्यात आल्याचे प्रकार तालुक्यामध्ये शेलवड व तालुक्यातील सर्व गावांमध्ये घडलेला असून सुद्धा संबंधित अधिकारी कारवाई करण्याकरता धजावत असतात.

जलचक्र खु॥ येथील स्वच्छ व हागणदारी मुक्त गाव असलेल्या फलकावर जवळच घाण्याचे साम्राज्य दिसून आले संबंधित हे झोपेचं सोंग का घेतात? सन 2018-2019 मध्ये वेळोवेळी अंदाजित 3 लाख 49 हजार रुपये,3 लाख रुपये,30 लाख रुपये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत खर्च, 1 लाख 50 हजार रुपये,1 लाख 10 हजार रुपये, स्वच्छता व आरोग्य यासाठी लाखो रुपये ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोग या अंतर्गत खर्च करण्यात आलेला आहे, तरीसुद्धा जलचक्र खु गावाची आरोग्याची परिस्थिती गंभीर आढळून येते आहे. संबंधित ग्रामपंचायत दुर्लक्ष करून येताना दिसत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या