Friday, May 3, 2024
HomeUncategorizedचविष्ट मटन बिर्याणी व दही तड़का

चविष्ट मटन बिर्याणी व दही तड़का

साहित्य

4 वाटी भिजलेले तांदूळ, अर्धा किलो मटन, 1 वाटी कोथिंबीर,4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 काळीमिरी, 2 वेलची, 2-3 तमालपत्र, अर्धा चमचा शहाजिरे, अर्धा कप दही, 1 लिंबाचा रस, अर्धी वाटी पुदीना, 4 मोठे चमचे तेल, 2 मोठे कांदे उभे चिरलेले, अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार

- Advertisement -

कृती

मटनामध्ये मीठ व हळद टाकुन कुकरमध्ये 4-5 शिट्या करुन घेणे. एका मोठ्या पातेल्यात तेल टाकून त्यात शहाजिरे, वेलची, दालचिनी, काळीमिरी टाकावी. खडा मसाला टाकल्यानंतर कांदे व तमालपत्र टाकावे. कांदा लालसर परतल्यानंतर मिक्सरमध्ये आलं-लसुण पेस्ट, कोथिंबीर हिरव्या मिरच्या वाटुन ते मिश्रण त्या पातेल्यात टाकणे. दोन- तीन मिनिटे हे मिश्रण परतल्यानंतर त्यात तांदुळाच्या दुप्पट पाणी टाकणे हे मिश्रण उकळल्यानंतर त्यात केवळ भिजलेले तांदूळ, फेटलेले दही, बारिक चिरलेले पुदीना व कोथिंबीर, लिंबाचा रस टाकून भात 50% शिजवून घेणे व त्यात शिजलेले मटन टाकणे. भात 90-95% शिजत आल्यानंतर गॅसवर तवा गरम करने व मंद आचेवर झाकण लावून भात मुरायला ठेवणे. 15 मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करणे व कोथिंबीर, पुदीना टाकणे.

दही तड़का

साहित्य

1 वाटी दही, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धने पुड़, अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, बारिक चिरलेली कोथिंबीर, जीरे, हिंग, कढीपत्ता

कृती

तड़का पॅन मध्ये 1 छोटा चमचा तेल गरम करणे. त्यात जीरे टाकणे. जीरे फुलल्यानंतर हिंग व कढीपत्ता टाकणे आणि गॅस बंद करणे व त्यात लाल मिरची, धने पुड़, चाट मसाला टाकणे व तयार झालेला तड़का दही वर घालून मीठ व कोथिंबीर टाकून चांगले एकजीव करून घेणे.

खुशबू कौसर शेख (नाशिक)

- Advertisment -

ताज्या बातम्या