Friday, May 3, 2024
HomeUncategorizedवैद्यनाथ मंदिर उडवण्याच्या धमकीप्रकरणी दोघे ताब्यात

वैद्यनाथ मंदिर उडवण्याच्या धमकीप्रकरणी दोघे ताब्यात

औरंगाबाद – aurangabad

परळी येथील वैद्यनाथ देवल समितीच्या विश्वस्तांच्या नावे पत्र पाठवून ५० लाख रुपये पाठवा, अन्यथा वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवू, अशी धमकी देणाऱ्याविरुद्ध संस्थानच्या तक्रारीवरून परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, बीडच्या दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी नांदेड येथून शनिवारी विमा प्रतिनिधी व एका बांधकाम व्यावसायिकाला ताब्यात घेतले. बॉम्बशोधक व नाशक पथक व श्वानपथकाने मंदिराची तपासणी केली.

मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांना शुक्रवारी व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने रतनसिंग रामसिंग दख्खने (रा. काळेश्वर नगर, विष्णुपुरी, नांदेड) या पत्त्यावरून एक पत्र आले. बीड व परळी पोलिसांनी नांदेड येथे जाऊन शोध घेत दोघांना ताब्यात घेतले आहे. ‘आमच्यासोबत कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. कारण पुढील दोन दिवसांत आमची कोर्टाची तारीख असून ज्यांच्याशी वाद चालू आहे त्याच व्यक्तींनी आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले आहे,’ असा आरोपही ताब्यात घेतलेल्या दोघांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या