Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील दोन मंदिरांना धमकींचे पत्र, ५० लाख द्या अन्यथा...

राज्यातील दोन मंदिरांना धमकींचे पत्र, ५० लाख द्या अन्यथा…

बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर (Parali Vaijanath Temple) समितीच्या अध्यक्षांना आलेल्या धमकीच्या पत्रामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला मंदिरालाही धमकीचं पत्र मि‌ळाले आहे. दोन्ही मंदिरे बीड जिल्ह्यातील आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा मंदिर उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. धमकीच्या पत्रावर नांदेडचा पत्ता आहे.

कतरिना-विकी लग्नातूनही असे मिळवणार पैसे

- Advertisement -

वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा RDX ने मंदिर उडवून देवू”, अशा आशयाचे आलेले पत्र आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत परळी शहर पोलीस ठाण्यात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मंदिर परिसराच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

दोन दिवसापूर्वी परळी वैजनाथ देवस्थानला ५० लाख रुपयांची मागणी करणारे पत्र मिळालं होतं. आता दुसरं धमकी पत्र अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या नावाने पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रावर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आला आहे. हे पत्र कोणी पाठवलं याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या