Friday, May 3, 2024
Homeनगरकेडगाव ते अरणगाव रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाचे काम लवकरच

केडगाव ते अरणगाव रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाचे काम लवकरच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केडगाव-अरणगाव महामार्गाला (Kedgaon-Arangaon Highway) जोडणारा रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाच्या (Railway Crossing Subway) कामासाठी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter session) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve) यांची भेट घेऊन निधी मिळविण्यात येईल. रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न मार्गी लावू. केडगाव (kedgav), अरणगाव (Arangav), बुरुडगाव (Burudgaon) परिसरामध्ये राहणार्‍या नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून केंद्र सरकारकडून लवकरच मान्यता आणू अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी दिली.

- Advertisement -

केडगाव-अरणगाव-बुरुडगावला जोडणार्‍या रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्गाच्या (Railway crossing underground connecting Kedgaon-Arangaon-Burudgaon) कामासाठीची पाहणी खा.डॉ. विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी केली. यावेळी समवेत स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर (Manoj Kotkar) , नगरसेवक राहुल कांबळे, गणेश नन्नवरे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, अजित कोतकर, बच्चन कोतकर तसेच केडगाव ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी कोतकर म्हणाले, हा क्रॉसिंगच्या भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे.केडगाव-आरणगाव-बुरुडगाव येथे मोठी लोकवसाहत निर्माण झाली आहे.

भुयारी मार्गाचे प्रश्न निकाली लागला तर हे तिनही गावे एकमेकांना जोडले जाईल व नागरिकांना दळणवळणासाठी जवळचा मार्ग निर्माण होईल. आता नागरीक रेल्वे क्रॉसींग वरूनच जीवघेणे प्रवास करत आहे. प्रवास करीत असताना अनेक अपघात या ठिकाणी घडले आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी खा. डॉ. विखे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रविवारी प्रत्यक्षात त्यांनी स्वतःहून या कामाची पाहणी केली व लवकरच काम मार्गी लावून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या