Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedधक्कादायक... औरंगाबादेत शिक्षकच 'पॉझिटिव्ह'!

धक्कादायक… औरंगाबादेत शिक्षकच ‘पॉझिटिव्ह’!

औरंगाबाद – aurangabad

शहरातील एका नामांकित शाळेतील 57 वर्षीय क्रीडा (Sports teacher) शिक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी (Positive) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संबंधित शाळेतील शिक्षक व काही विद्यार्थ्यांचीही चाचणी करण्यात आली. तसेच पुढील तीन दिवस शाळेला सुटी देण्यात आली आहे. त्यातच नाताळ व रविवारची सुटी आल्याने चार दिवस शाळा बंद राहील,

- Advertisement -

मात्र ऑनलाइन वर्ग (Online class) सुरू राहतील, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. बाधित शिक्षकाला सौम्य लक्षणे असून महापालिकेचे पथकही शाळेत येऊन पाहणी करून गेले. या शिक्षकाला सध्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. शाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व शिक्षकांची चाचणी करण्यात आली होती. मात्र एक शिक्षक बाधित निघाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शिक्षकांचे पुन्हा स्वॅब घेण्यात आले.

नमुणे जीनोम सीक्वेन्सिंगसाठी

जगभरात कोरानाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवलेली असताना राज्यात पहिलीपासून सातवीच्या शाळा सुरू करण्यात आला. आता याच शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव होताना दिसून येत आहे. औरंगाबाद शहरातील औरंगपुरा येथील नामांकित शाळेतील खासगी अनुदानित शाळेत शिक्षकाला कोरोना झाल्याची माहिती गुरुवारी समोर आली आहे.

दुसऱ्या गावातून आल्यानंतर कोरोनाची लागण कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकाचे वय 57 वर्षे असून ते नुकतेच एका गावातून आले होते. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्वांच्या आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ही चाचणी मात्र पॉझिटिव्ह आली आहे.

शिक्षकाचा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सर्व शिक्षकांची सुद्धा आरटीपीसीआर टेस्ट (RTPCR test) करण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच काल आणि परवा शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यी आणि स्टाफची चाचणी केली आहे. या संदर्भातील माहिती मनपा प्रशासनाला देण्यात आली असून शाळा सॅनिटाइझ करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या