Saturday, June 15, 2024
Homeनगरएसटी बस-कारच्या अपघातात चौघे ठार; तिघे गंभीर जखमी

एसटी बस-कारच्या अपघातात चौघे ठार; तिघे गंभीर जखमी

बेलवंडी, श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

- Advertisement -

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एसटी बस व कारची समोरासमोर धडक (ST Bus and Car Accident) होऊन झालेल्या अपघातात कारमधील चौघे ठार (Death) तर तिघे गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील ढवळगाव हद्दीत आज दुपारी 3 वाजता घडली. मृत व जखमी सर्व तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील रहिवाशी आहेत. हे सर्वजण एकादशी निमित्त आळंदी येथे देवदर्शन करून माघारी येत असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे पारगाव सुद्रीक गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात (Accident) पारगाव सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन विश्वनाथ लक्ष्मण ननवरे (55), पारगाव संचालक हरी तुकाराम लडकत (60), ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके (55), दत्तात्रय बळीराम खेतमाळीस (60, रा. सर्व पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर कार चालक विठ्ठल गणपत ढाले (36, रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा), रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस (70), रोहिदास हरिभाऊ सांगळे (72, रा. पारगाव सुद्रीक) हे तिघे गंभीर जखमी (Injured) झाले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे 34 नंबर चारीच्या वळणाला ओव्हरटेक करताना ईर्टीका कार (क्र.एम.एच.12 टि.वाय. 4352) व श्रीगोंदाकडून शिरूरला (Shirur) जाणारी एसटी बस (क्र. एम एच 14 बी टी 0873) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. यात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ईर्टीक कारचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे. तर एसटीत प्रवास करणारे सुमारे सोळा प्रवाशी सुखरूप आहेत. बेलवंडी पोलीस व श्रीगोंदा आगार कर्मचारी यांना माहिती मिळताच त्यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली. मयतांचे मृतदेह शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात (Belwandi Police Station) आपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मारुती कोळपे हे पुढील तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या