Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशब्रिटनमध्ये वर्क फ्रॉम होम बंद, मास्कची अनिवार्यता रद्द

ब्रिटनमध्ये वर्क फ्रॉम होम बंद, मास्कची अनिवार्यता रद्द

जगात कोरोना व्हायरसने कहर सुरूच ठेवला आहे. कोरोना महामारी आता तिसऱ्या वर्षात पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे (corona)नवीन प्रकार सतत कहर करत आहेत. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. दरम्यान, सरकारने हळूहळू कोरोनाचे निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. संसर्गात चौथ्या क्रमांकावरील ब्रिटनमध्ये गुरुवारी वर्क फ्रॉम होमची (work from home)व्यवस्था थांबवण्यात आली. तसेच मास्कची (face masks)अनिवार्यता थांबवण्यात आली आहे. कोरोना आता आपल्या जीवनाचा एक भाग झाला आहे, असे सरकारने म्हटले आहे. त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे.

लसीकरण झालेल्यांचे काॅलेज बंद, पण मुलांच्या शाळा सुरु, काय आहे घोळ?

- Advertisement -

ब्रिटनमध्ये ७२ टक्के लोकांना दोन डोस मिळाले आहेत. ५५ टक्के बूस्टर डोसही देण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमधील ९५ टक्के नागरिकांना संसर्ग किंवा लसीकरणाच्या माध्यमातून अँटिबॉॅडीजची सुरक्षा मिळाली आहे, असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British prime minister Boris Johnson)यांनी म्हटले आहे. सरकारने निर्बंध हटवण्याचा पूर्ण आराखडाही तयार करून तो जाहीरही केला.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांच्या देशाने कोविड-19 सोबत जगायला शिकले पाहिजे. ते म्हणाले की, “सरकारने कोरोना विषाणूवरील निर्बंध उठवल्यानंतर ब्रिटन इतर देशांच्या तुलनेत वेगाने प्रगती करत आहे. आपल्याला कोरोनासोबत जगायला शिकावे लागेल. कोरोना जाणार नाही. ते आपल्यासोबत अनेक वर्षे किंवा कायमचे राहणार आहे. मला वाटते की आपण महामारी (साथीचा रोग) पासून सर्वसाधारण आजाराकडे वाटचाल करत आहोत. तुम्ही कोविडसोबत कसे जगू शकता हे आम्ही जगाला दाखवत आहोत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेले टेलिप्रॉम्प्टर आहे काय?

यूकेत काय आहेत नवीन नियम

  • २७ जानेवारीपासून सार्वजनिक ठिकाणच्या मास्कचा नियमही दूर करण्यात आला आहे.

  • २७ पासून कोविड पास व केअर होमदेखील खुले करण्यात आले आहेत. म्ह

  • लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना ब्रिटनमध्ये परत आल्यावर निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवालही आता बंधनकारक नसेल.

  • २४ मार्चच्या प्रस्तावित सेल्फ आयसोलेशनचा नियमही मागे घेण्यात आला.

  • ब्रिटनमध्ये स्वयंविलगीकरणाचा कालावधी सात दिवसांवरून पाच दिवस करण्यात आला होता.

UIDAI कडून स्पष्टीकरण : असे आधार कार्ड ठरणार बिनकामाचे

थायलंड : क्वाॅरंटाइन फ्री व्हिसा सुरू होणार

थायलंडने पर्यटकांसाठी क्वाॅरंटाइन फ्री व्हिसा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता थायलंडमध्ये येणाऱ्या लोकांना सात दिवसांचे अनिवार्य क्वाॅरंटाइन नसेल. नवे नियम एक फेब्रुवारीपासून लागू होतील.

पोर्तुगाल : महामारी संपण्याच्या दिशेने

राष्ट्रपती रिबेलो सुसा म्हणाले, कोरोना महामारी आता आमच्या देशात संपण्याच्या दिशेने आहे. देशातील ९० टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस दिले आहेत. रुग्णसंख्या स्थिर आहे. बुधवारी ५० हजार नवे रुग्ण समोर आले.

पाकिस्तान भारतात मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत

स्पेन : आणीबाणी नाही, सामान्य आजार

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज म्हणाले, संसर्गाच्या बाबतीत आता आणीबाणीची स्थिती नाही. उलट आता हा सामान्य आजार म्हणून आम्ही पाहत आहोत. बुधवारी १५७९४१ रुग्ण आढळून आले. पुढील आठवड्यापासून नियमांत शिथिलता दिली जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या