Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांची मान शरमेने खाली जाईल अशी कृती...; उपमुख्यमंत्र्यांनी मालेगावच्या नगरसेवकांचे टोचले...

शरद पवारांची मान शरमेने खाली जाईल अशी कृती…; उपमुख्यमंत्र्यांनी मालेगावच्या नगरसेवकांचे टोचले कान

मुंबई | mumbai

नाशिक येथील मालेगाव महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसला (Congress) खिंडार पाडले आहे. महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे….

- Advertisement -

यावेळी अजित पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. ते पुढे म्हणाले की, नवाब मलिकांकडे असलेल्या विभागाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना उभे करण्याचे काम आपण करतो.

आपल्या समाजात इतरांच्या तुलनेत शिक्षण कमी आहे. त्यावर कसे काम करता येईल, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मौलाना आझाद मंडळाच्या माध्यमातून कशी मदत करता येईल, यासाठी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकचा विकास झाला, तसाच मालेगावच्या बाबतीतदेखील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने एकत्र बसून चर्चा करू. राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला तो अतिशय योग्य आहे, हे तुम्हाला कामातून सिद्ध करून दाखवू, ही ग्वाही मी सर्व सहकाऱ्यांना देतो. अनेक प्रश्न निर्माण होणार आहेतच. पण त्यातून मार्ग काढण्याचे काम आपण करू असेदेखील उपमुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, आपल्याकडून कुठलीही चूक होऊ देऊ नका. कायद्याचे, नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारीही घ्या. नाहीतर राष्ट्रवादी पक्षात आपण गेलो आहे, गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे, पालकमंत्री आपलेच आहेत, भुजबळ साहेब घरचे आहेत, प्रांताध्यक्ष आपले आहेत, अजित पवार आपले आहेत असे ते म्हणाले.

आम्ही जरूर तुमचे आहोत. पण तुमच्या कुठल्या कृतीतून राष्ट्रवादी पक्षाला, नेत्याला कमीपणा येईल. शरद पवारांची मान शरमेने खाली जाईल, अशी कृती अगदी छोट्या कार्यकर्त्याकडून देखील घडता कामा नये, याची खबरदारी आपण घ्या. आता तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या