Friday, May 3, 2024
Homeनाशिककांदा भाव गडगडल्याने नाराजी

कांदा भाव गडगडल्याने नाराजी

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

मागील महिन्यात लाल कांदा (red onion) सरासरी 2451 रुपये तर कमाल 2922 रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला आहे. मात्र एकाच महिन्यात लाल कांदा सरासरी 870 रु. तर कमाल 1125 रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे. तीस दिवसात टप्याटप्याने कांदा दर 1581 रुपये प्रति क्विंटलने घसरल्याने शेतकर्‍यांचे (farmers) बजेट कोसळले आहे.

- Advertisement -

देशांतर्गत गुजरात (gujrat), मध्यप्रदेश (madhya pradesh), राजस्थान (rajsthan) येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल (West Bengal) येथील सुखसागर या ठिकाणी आणि लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने तसेच राज्यात नाशिक (nashik), अहमदनगर (ahmednagar) व पुणे (pune) जिल्ह्यातील चाकण (chakan) आणि सोलापूर (solapur) या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची (summer onion) लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे. होळीच्या निमित्ताने परप्रांतीय मजूर घरी गेला आहे. त्यामुळे कांद्याचे लोडिंग-अनलोडिंग करायला मजुरच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कांदा तसाच पडून आहे.

कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी

युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे (Ukraine-Russia war) सगळीकडे महागाईचा (Inflation) भडका उडाला असला तरी कांद्याचे भाव मात्र घसरले आहेत. त्यातच आयात-निर्यात धोरण (Import-Export Policy) आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे कांद्याची निर्यात ही मंदावली असल्याने कांद्याला उठाव नाही. कांदा लागवड ते साठवणूक, विक्री व्यवस्थापन यामध्ये उत्पादकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

तसेच वीज, पाणी, इंधन दरवाढ, खतांच्या वाढत जाणार्‍या किंमती याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. ज्यावेळी देशातील कांद्याचे दर वाढतात त्यावेळी सरकारकडून दर कमी करण्यासाठी हालचाली केल्या जातात. कांद्याच्या दरात घसरण होत असताना केंद्र सरकारकडून कोणत्याही हालचाली होतांना दिसत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या