Friday, May 17, 2024
Homeनगरपैलवानांचा मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या

पैलवानांचा मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वैदूवाडी येथे 1980 सालची तालीम आहे. वैदूवाडीतील सर्व पैलवान या तालमीमध्ये व्यायाम व कुस्तीचा सराव करत असत. ही तालीम खूप जुनी असल्यामुळे नादुरुस्त झाली आहे. कोणत्याहीवेळी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही वैदूवाडीतील मंजूर तालमीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे वैदूवाडीतील पैलवानच्यावतीने आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात ठिय्या करून करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी तायगा शिंदे, मनपाचे विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, भाजपाचे सावेडी मध्य मंडळ अध्यक्ष सतीश शिंदे व वैदूवाडीतील पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले वैदूवाडीला कुस्ती क्षेत्राची एक मोठी परंपरा आहे. या तालमीतील पैलवानांनी राज्यभर कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे.

आत्ताही वैदूवाडीतील पैलवान कुस्ती क्षेत्रामध्ये भरारी घेऊन नगर शहराचे नावलौकिक करत आहेत. परंतु वैदुवाडीतील तालीम नादुरुस्त असल्यामुळे पैलवानांना व्यायाम व कुस्तीच्या सरावासाठी तालीम व्यवस्थित असणे गरजेचे आहे. यामुळे मंजूर असलेली तालमीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. त्यावर आयुक्त गोरे यांनी येत्या आठ दिवसांमध्ये मंजूर तालमीचे काम सुरू करू, असे आश्वासन पैलवानांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या