Friday, May 3, 2024
Homeनाशिकबायबल पठणास विरोध; असहकार आंदोलनातही होता सहभाग

बायबल पठणास विरोध; असहकार आंदोलनातही होता सहभाग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशातील 75 स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत विशेष गौरव करण्यात येणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील करंजगाव (ता.निफाड) (Karanjgaon Niphad) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्रीपाद अमृत डांगे (Shripad Amrut Dange) यांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबियांचा दि. 28 एप्रिल रोजी गौरव केला जाणार आहे. महाराष्ट्रातील पाच स्वातंत्र्यसैनिकांचा यामध्ये समावेश यामध्ये करण्यात आहे…

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील करंजगाव या गावी श्रीपाद डांगे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1899 रोजी झाला.त्यांचे शालेय शिक्षण नाशिकमध्ये झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईतील विल्सन महाविद्यालयात गेले. तेथे त्यांनी बायबलच्या सक्तीचा पठणास विरोध केला आणि गांधीजींच्या असहकार चळवळीत सहभाग घेतला. 1924 मध्ये श्रीपाद डांगे तुरुंगात गेले व 1927 मध्ये त्यांची सुटका झाली. 1926-27 चा कामगार चळवळींना मुंबईमध्ये जोर चढला.

डांग्यांनी गिरणी कामगारांची संघटना त्यांनी उभी करण्यास प्रारंभ केला. डांगे अखिल भारतीय ट्रेंड युनियन काँग्रेसचे (आयटकचे) सहसचिव झाले. 1929 मध्ये त्यांना मीरत कटात सामील झाल्याबदल पुन्हा अटक झाली आणि सात वर्षांच्या शिक्षेनंतर 1935 मध्ये ते सुटले.

यावेळी ब्रिटिश सरकारने (British Government) कम्युनिस्ट पक्षावर बंदी (Ban on communist party) घातली होती. 22 मे 1991 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात असलेली मुलगी मुंबईत राहते. तसेच इतर नातेवाईकांचा प्रशासनाने आता शोध सुरु केला आहे.

महाराष्ट्रातील नाशिकमधून श्रीपाद डांगे, रायगड जिल्ह्यातील भाई कोतवाल, वासूदेव बळवंत फडके व विनायक नरहरी भावे (विनोबा भावे) यांचा तर वर्धा जिल्ह्यातील पांडुरंग खानखोजे या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे. त्यांच्या वारसांना प्रशासनातर्फे गौरविले जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या