Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’आजपासून

‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’आजपासून

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दै.’देशदूत’ ( Daily Deshdoot )आयोजित तसेच ललित रुंगटा ग्रुप ( Lalit Rungta Group ) प्रायोजित ‘इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो 2022’ ( Indira Nagar Prpperty Expo-2022 ) च्या माध्यमातून सामान्यांचे गृह स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी ‘देशदूत’ने उपलब्ध करून दिली आहे.

- Advertisement -

आजपासून इंदिरानगर येथील अजय मित्रमंडळ पटांगणावर, रथचक्र हौसिंग सोसायटीजवळ, एचडीएफसी बँकेमागे सुरू होत असलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या हस्ते व ललित रुंगटा ग्रुपचे डायरेक्टर अभिषेक बुवा, नगरसेविका डॉ.दीपाली कुलकर्णी आणि नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी चार वाजता होणार आहे.

हा एक्स्पो रविवार दि. 1 मे 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. भविष्यातील ‘स्मार्ट सिटी’ ( Smart City )बनण्यासाठी नाशिकची वाटचाल सुरू असतांना नाशिक शहरातील इंदिरानगर परिसराने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शॉपिंग मॉल असो वा सुपर मार्केट, शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मोठमोठे हॉटेल्स, भव्यदिव्य गृह व व्यावसायिक प्रकल्प, आसपासच्या गावांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग, रिक्षा बसच्या फेर्‍यांसह शहरातील कोणत्याही भागात थेट जाण्यासाठीची उत्तम कनेक्टिव्हिटी, झपाट्याने विस्तार होणार्‍या या भागात सर्वकाही उपलब्ध आहे. भौगोलिक विस्तार पाहता शहराच्या डेड एन्ड पर्यंत नागरी वसाहतींचे जाळे पसरल्याचे दिसून येते.

इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पोत नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यात अनेक लाभदायक योजनांचा समावेश आहे. तीन दिवसात दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान विजेत्यास काबरा इम्पोरिअमतर्फे रोज 3 पैठण्या, तर नाशिकमधील सोने चांदीचे प्रसिद्ध व्यापारी सुराणा ज्वेलर्स यांच्याकडून दररोज 3 चांदीचे नाणे दिले जाणार आहे.

सामान्यजनांना गृह स्वप्नाची पूर्ती करण्याची अनोखी संधी प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. देशदूत प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत. 1 मे पर्यंत दररोज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी दै.‘देशदूत’आयोजित ‘इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो’ला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या