Friday, May 17, 2024
Homeनगरसोनाराला लुटणारा श्रीरामपूरचा आरोपी जेरबंद

सोनाराला लुटणारा श्रीरामपूरचा आरोपी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुकानातील दागिणे बॅगमध्ये भरून घरी घेऊन जात असताना सोनाराच्या डोळ्यात मिरचीपुड फेकून दागिणे लुटणार्‍या टोळीतील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपूरातून अटक केली. विजय रामकृष्ण देडगावकर (रा. सुर्यानगर वार्ड नंबर 7, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, फसवणूकीचे सात गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

21 जानेवारी, 2020 रोजी निखिल बाळासाहेब आंबिलवादे (वय 21 रा. खेडले परमानंद ता. नेवासा) हे ज्वेलर्सचे दुकान बंद करून, दुकानातील दागिणे बॅगमध्ये भरून घरी जाण्याच्या तयारीत असताना दुचाकीवरील तिघांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून आंबिलवादे यांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकली होती. आंबिलवादे यांच्याकडील दागिण्याची बॅग घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील पसार असलेल्या आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना या गुन्ह्यातील संशयीत आरोपी विजय देडगावकर हा कोल्हार बु (ता. राहाता) येथे राहत नसून तो सध्या सुर्यानगर (श्रीरामपूर) येथे राहत असल्याची खबर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापू फोलाणे, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, भिमराज खर्से, रवी सोनटक्के, मच्छिंद्र बर्डे, बबन बेरड यांच्या पथकाला आरोपी देडगावकर याचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथकाने आरोपी देडगावकर याला सुर्यानगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. अधिक तपास सोनई पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या