मुंबई । Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या सहाव्या (Rajya Sabha Election 2022) जागेवरून राज्यातील राजकारण तापले आहे.
शिवसेनेनं (Shivsena) दिलेला प्रस्ताव नाकारल्यांनंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) अपक्ष म्ह्णून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे संभाजीराजेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्याच दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचा फोटो शेयर करत लिहिलं की, “महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…” असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे.
दरम्यान संभाजीराजेंच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक पोस्टर देखील व्हायरल केलं आहे. आता ‘राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार’ असा मजकूर या पोस्टरमध्ये छापण्यात आला आहे. यामुळे आता संभाजीराजे कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचचं लक्ष लागलंय.