Friday, May 3, 2024
Homeधुळेआयुष्याला दिशा देण्यासाठी अभियान-घोडमिसे

आयुष्याला दिशा देण्यासाठी अभियान-घोडमिसे

धुळे । Dhule प्रतिनिधी

कोरोना (Corona) काळानंतर बर्‍याच दिवसांनी वस्तीगृह पुन्हा भरभरू लागली आहेत. तुमच्या मनामध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी मनावरची मरगळ (Mindfulness) दुर करण्यासाठी व आयुष्याला दिशा देण्यासाठी (give direction to life) प्रतिभेचे बीज उमलतांना (seeds of talent are sprouting) हे मानसशास्त्रीय अभियान (Psychological campaigns) राबविले जात आहे. याचा फायदा तुम्हाला आयुष्यात नक्कीच होईल अशी अपेक्षा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्पाधिकारी (Project Officer of Integrated Tribal Development Project) तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

येथील आदिवासी वस्तीगृहात प्रतिभेचे बीज उमलतांना या मानसशास्त्रीय अभियानाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी प्रा. वैशाली पाटील या उपस्थित होत्या.

प्रा. पाटील म्हणाल्या की , आयुष्यातील पंधरा ते तीस या कालखंडात आपण मनाच्या मनगटात जी बीजे तुम्ही पेराल तीच पुढे आयुष्यात उगवतात. मग तुमच भविष्य बदलत. जीवनाची वाटचाल भक्कम करण्यासाठी हे अभियान राबविले जात आहे. आयुष्यात ध्येय निवडताना ज्यामध्ये परमानंद वाटतो असे ध्येय निवडा. कारण आवडणार्‍या गोष्टीत आपण रमू शकतो. मग केलेली प्रत्येक कृती ही उत्तमच होते. आत्मविश्वास वाढून आपोआपच पावलांना गती मिळते. त्यावेळी अनेक अडथळ्यांचेही पंख होतील आणि काट्यांचेही फुल होतील असे त्यांनी सांगितले.

या गरुडपंखी दिवसांत अनेक मोहाचे अडथळे असतात. त्यात कधी आळस, वाद, आजारपण, गरिबी, फेसबुक,व्हाट्सअप,प्रेम, आकर्षण या सर्व मोहांना बाजूला सारून तुम्ही ध्येयावर लक्ष केले तर यश मिळू शकते. मनात जेव्हा जिद्दीची ठिणगी पेटते, तेव्हा मोहाच्या अनेक अडथळ्यांना तुम्ही बळी पडू शकत नाही. तेव्हा तुम्ही विशाल दृष्टिकोनाचा धबधबा बनतात. लक्षात घ्या धबधब्याला कधीच अडथळे नसतात असेही प्रा. वैशाली पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या