Friday, May 3, 2024
HomeUncategorizedबूस्टर डोसचा कालावधी झाला कमी

बूस्टर डोसचा कालावधी झाला कमी

औरंगाबाद – aurnagabad

कोरोना (corona) लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिकांना (Booster dose) बूस्टर डोस घेण्यासाठी आता ९ महिन्यांऐवजी ६ महिन्यांनी डोस घेता येणार आहे. शासनाने बूस्टर डोसचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना शासनाने बूस्टर डोस घेण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत ४८,२१६ नागरिकांनी बूस्टर डोस घेतल्याची माहिती मनपा (Department of Health) आरोग्य विभागाने दिली.

- Advertisement -

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स व ६० वर्षांवरील नागरिकांना ७ जुलैपासून पूर्वीप्रमाणे शासकीय रुग्णालय व मनपा आरोग्य केंद्रातून विनाशुल्क बूस्टर डोस (प्रिकॉशन डोस) उपलब्ध असेल. ज्या नागरिकांना दुसरा डोस घेऊन ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाले आहेत, अशांनी विनामूल्य बूस्टर डोस घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले.

१८ ते ५९ वयोगटातील नागरिकांनी दुसरा डोस घेऊन ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाले असतील, तर खासगी लसीकरण केंद्रावर सशुल्क बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन डॉ. मंडलेचा यांनी केले. कोरोनाची संभाव्य चौथी लाट टाळायची असेल तर बूस्टर डोस महत्त्वाचा ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या