Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याबंदुकीचा धाक दाखवत लुटली २५ किलो चांदी

बंदुकीचा धाक दाखवत लुटली २५ किलो चांदी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दोन दुचाकीवर आलेल्या पाच अज्ञात व्यक्तींनी पिस्टलचा धाक दाखवत कुरिअर सर्विस कंपनीच्या कामगारांकडून तब्बल २५ किलो चांदी लंपास केल्याप्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात (Sarkar wada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित सिंग धनसिंग शिखरवाल (२४, रा. फावडे लेन, मेन रोड, नाशिक, मूळ रा. नगला लालदास, रायबाग जिल्हा आग्रा, उत्तर प्रदेश ) हे जय बजरंग कुरियर व पार्सल सर्विसेस सराफ बाजार येथे कुरियर सर्विसचे काम करतात.

(दि.२१) नेहमीप्रमाणे रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास नाशिकमधील विविध सराफांचे त्यामध्ये टकले बंधू सराफ यांचे 6.943 वजनाचे चांदीचे पार्सल, खुबानी ज्वेलर्स यांचे 5.123 ग्रॅम वजनाचे चांदीचे पार्सल, बाफना ज्वेलर्स यांचे १.४४७ ग्रॅम वजनाचे चांदीचे पार्सल, हर्षित ज्वेलर चाळीसगाव यांचे 12 किलो 10 ग्रॅम वजनाचे चांदीचे पार्सल असा 12 लाख 25 हजार रुपयांचे पार्सल देण्याकरिता किशोर सुधारलय येथून ठक्कर बाजार या ठिकाणी त्यांचे सोबत राज शर्मा व विष्णूकुमार सिसोदिया यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते.

किशोर सुधारलयाच्या समोर पाठीमागून एका दुचाकीवरून दोन जण व एका मोपेड वरून तीन जण वेगात येऊन त्यांनी अमितसिंग यांची गाडी अडवली व मोपेडवर बसलेल्या व्यक्तीने त्यांना लाथ मारून खाली पाडले व त्यांच्या डोक्यावर बंदूक लावली.

हा प्रकार बघून राज शर्मा व विष्णू तेथून घाबरून पळून गेले. यावेळी संशयितांपैकी एकाने अमित सिंग यांची एक्टिवा दुचाकी(एम एच 12 टी एफ 7512 ) व चांदीचे पार्सल घेऊन ठक्कर बाजारच्या दिशेने पलायन केले.

यावेळी लुटमार करणाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेली हिरो होंडा कंपनीची सीडी डीलक्स मोटरसायकल (एम एच 15 जी एस5966 ) ही तेथेच सोडून गेले.

या लुटमारीत तब्बल 12 लाख 25 हजार रुपयांचे चांदीचे पार्सल व 50 हजार रुपये किमतीची ऍक्टिवा मोपेड असा 12 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लुटारूंनी पळवून नेला.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वपोनी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या