Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई | Mumbai

राज्याचं पावसाळी अधिवेशन हे सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीने गाजलं. मात्र त्याच दरम्यान एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. २३ ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली.

या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते. सुभाष देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या