Friday, May 3, 2024
Homeनगरचांदा ग्रामसभेत वीज वितरण करवसुली, पाणी प्रश्नासह विविध विषयांवर चर्चा

चांदा ग्रामसभेत वीज वितरण करवसुली, पाणी प्रश्नासह विविध विषयांवर चर्चा

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा येथील ग्रामसभेत विजवितरणकडे असलेली जवळपास आठ लाखाची कर वसुली, जुनी पाण्याची टाकी पाडणे, पाणीपट्टी वसुली, पाणी वाटप नियोजन यासह विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव संमत झाले.

- Advertisement -

सरपंच ज्योतीताई जावळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या सभेच्या प्रारंभी प्रोसेडिंग वाचन ग्रामविकास अधिकारी रजनीकांत मोटे यांनी केले. जवाहर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य के. एच. जावळे यांनी शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंदाच्या आरोग्य सहाय्यकांनी विविध आजार व त्यावरील उपाय, बुस्टर डोस याबाबत माहिती दिली. त्यानंतर गावातील विविध प्रश्नांसंर्दभात अनेक वक्त्यांनी चर्चा केली.

विजवितरणकडील कर वसूल करणे, जुनी पाण्याची टाकी पाडणे, पाणी योजनांचा पाठपुरावा करणे, लोहारवाडी रोडवरून घोडेगाव रोड पर्यंत बायपास करणे, वृद्ध, परित्यक्ता आदींसाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, पाणीपट्टी भरण्यासाठी प्रोत्साहित करणे, प्राथमिक शिक्षकांकडील बीएलओची कामे गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना देणे, पुर्णवेळ ग्रामविकास अधिकारी मिळावेत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणासाठी गावातील सर्वपक्षीय नेतेमंडळीची बैठक घेणे, गावातील पार ओटा स्वच्छ करणे आदी विषयांवर सखोल चर्चा होऊन ठराव करण्यात आले.

यावेळी माजी सभापती कारभारी जावळे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत, उपसरपंच चांगदेव दहातोंडे, भाजपाचे कैलास दहातोंडे, रमाकांत दहातोंडे, देविदास पासलकर, किरण जावळे, गणपत पुंड, बाळासाहेब दहातोंडे, सतिष गाढवे, बाबासाहेब आल्हाट, गोरक्षनाथ दिवटे, कार्तिक पासलकर, अरूण बाजारे, संतोष गाढवे, संतोष जावळे आदींनी चर्चेत भाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या