Saturday, May 4, 2024
Homeनगरकंपनीत चोरी करणार्‍याविरूद्ध गुन्हा

कंपनीत चोरी करणार्‍याविरूद्ध गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कंपनीत माल वाहतुकीसाठी भाडेतत्वावर लावलेल्या रिक्षातून एकाने सात हजार रूपये किंमतीचे प्लास्टिक कव्हर असलेले बेरींगचा बॉक्स चोरून नेला आहे. सोमवारी सकाळी 11:15 वाजता नागापूर एमआयडीसीतील कॉम्टन कंपनीत ही घटना घडली.

- Advertisement -

या प्रकरणी मयुर विठ्ठल भांबरे (वय 30 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेखर दिलीप जावळे (रा. बोल्हेगाव फाटा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. जावळे याची रिक्षा (एमएच 16 बीसी 1480) कॉम्टन कंपनीत भाडेतत्वावर आहे.

सोमवारी जावळे याने त्या रिक्षातून सात हजार रूपये किंमतीचा बेरींगचा बॉक्स चोरून नेला असल्याचे भांबरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक पालवे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या