Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावा; केजरीवालांनंतर नितेश राणेंची मागणी

नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावा; केजरीवालांनंतर नितेश राणेंची मागणी

मुंबई | Mumbai

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवरील फोटोबाबत केलेल्या वक्तव्याने आता देशभरात वाद सुरू झाला आहे.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गांधीजींच्या फोटोसह देवी लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो असावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. भाजपा नेत्यांकडून अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल ही मागणी करत असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली दोनशे रूपयांची नोट शेअर केली आहे. आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेली नोट शेअर केली आहे. त्याला राणे यांनी ‘ये परफेक्ट है’ अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

केजरीवाल यांच्या मागणीवर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी म्हटलं की, “नोटांच्या नव्या मालिकेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नसावा? एका बाजुला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडक असायला हवेत.” केजरीवाल यांच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपस काँग्रेस आणि समाजवादी पार्टीनेही केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या