Friday, May 3, 2024
Homeनगरसंगमनेरच्या कत्तलखान्यावर एलसीबीची मोठी कारवाई

संगमनेरच्या कत्तलखान्यावर एलसीबीची मोठी कारवाई

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील खाटीक गल्ली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने (एलसीबी) छापा टाकून या कत्तलखान्यावर मोठी कारवाई केली. या कत्तलखान्यामधून 1 लाख 80 हजार रुपयांचे 900 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने करूनही शहरातील कत्तलखाने बंद होण्याचे नाव घेत नाहीत.

अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस संगमनेर शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी फिरत असताना एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांना शहरातील खाटीक गल्ली येथे कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकातील पोलिसांनी खाटीक गल्ली येथे जाऊन खात्री केली असता मोकळ्या जागेत काही इसम जनावरांची कत्तल करून मांस तोडताना दिसले.

पोलिसांनी छापा टाकल्याची चाहुल लागल्याने काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील सगीर बुडाण कुरेशी याला पकडण्यात पोलिसांना यश आले. इतरांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. या कत्तलखान्याची तपासणी केली असता कत्तलखान्यामध्ये 1 लाख 80 हजार रुपये किमतीचे 900 किलो गोमांस आढळले. या कत्तलखान्यामधून पोलिसांनी 2 सुरे, लोखंडी कुर्‍हाड जप्त केली.

याबाबत पोलीस नाईक सचिन दत्तात्रय आडबल यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सगीर बुढाण कुरेशी, (वय 40. रा. खाटीक गल्ली, संगमनेर ता. संगमनेर), मुशफिक मजरुल शेख (वय 50, रा. भारतनगर), मतीन बशीर कुरेशी (वय 35, रा. मोगलपुरा), फयीम खालीद कुरेशी (वय 35, रा. मोगलपुरा), इर्शाद कादर कुरेशी (रा. खाटीक गल्ली, संगमनेर), मुजाहीद अब्दुल करीम कुरेशी (रा. खाटीक गल्ली) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 269, 34 महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या