Friday, May 3, 2024
Homeनगरस्वस्तात साखर देण्याच्या आमिषाने अडीच लाखाला लुटले

स्वस्तात साखर देण्याच्या आमिषाने अडीच लाखाला लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

साखर कारखान्यातून स्वस्तात साखर मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुणे येथील एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून दोन लाख 54 हजार रुपयांना लुटले. नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातील रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली.

- Advertisement -

श्रीकांत सुधीर जोशी (वय 47 रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) असे लुटलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर धनराज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व त्याच्यासोबत असलेला अनोळखी इसम (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी जोशी हे व्यावसायिक असून त्यांना सागर धनराज नावाच्या इसमाने नगर जवळ सारोळा कासार परिसरात साखर कारखाना असून या कारखान्यातून तुम्हाला स्वस्तात साखर मिळवून देतो, असे आमिष दाखवले.

त्या आमिषाला भुलून फिर्यादी जोशी हे अडीच लाखांची रोकड घेऊन सारोळा कासार येथे आले. यावेळी दोघांनी त्यांना चाकुचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन लाख 50 हजारांची रोकड, 1 सॅमसंग कंपनीचा मोबाईल, चांदीची अंगठी व पाकीटातील 250 रुपयांची रोकड असा दोन लाख 54 हजार 450 रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या