Tuesday, May 7, 2024
Homeनगरसुकेवाडी, पावबाकीत रात्रीचा जागता पहारा

सुकेवाडी, पावबाकीत रात्रीचा जागता पहारा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरालगतच्या सुकेवाडी रोड व पावबाकी परिसरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या नागरिकांनी रात्रीचा जागता पहारा सुरू केला आहे. संशयास्पद फिरणार्‍या व्यक्तींची माहिती हे नागरिक घेताना दिसत आहे.

- Advertisement -

संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. दोन दिवसांपूर्वी पावबाकी व सुकेवाडी रोड परिसरात सहा दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. या दरोडेखोरांनी तीन घरांची लूट केली होती. चोरांनी केलेल्या मारहाणीत एक महिला जखमी झाली होती. या दरोड्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील नागरिकांकडून रात्रीचा पहारा सुरु करण्यात आला असून रस्त्यावर कोणी संशयास्पद फिरताना आढळला तर त्याची चौकशी केली जात आहे. काल रात्री एका व्यक्तीस अडवून त्याची चांगलीच विचारपूस करण्यात आली होती. शहर पोलिसांनी या दरोडेच्या घटनेतील चोरांना त्वरीत अटक करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या