Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकजिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सर्वसामान्य नागरिक आणि विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना आपले म्हणणे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत ( Chief Minister)पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय’ कक्ष ( The Chief Minister’s Secretariat)सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सचिवालयात पहिल्याच दिवशी दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

- Advertisement -

त्यातील एक विधी विभागाची तर दुसरी सहकार विभागाची आहे. प्रशासकीय कामकाजात लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार नाशिकमध्ये सचिवालय कार्यान्वित करण्यात आले आहे.

या कार्यालयात पहिल्याच दिवशी दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सध्या विभागीय कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित आहे. आता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. ज्या नागरिकांना आपले म्हणणे, तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, ते या कक्षात आपले अर्ज, निवेदन, सादर करू शकणार आहेत. त्यांच्या तक्रारी थेट मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहचतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या