Friday, May 17, 2024
Homeनगरडॉक्टरांवर चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

डॉक्टरांवर चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

नेवासा | का. प्रतिनिधी

नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांवर चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत डॉक्टर अविनाश बाळासाहेब काळे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आरोपीकडे उपचाराचे पैसे मागितले असता त्याचा राग आल्याने त्यांनी लथाबुक्क्यांनी मारहाण केली. चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला चाकूचा हा वार हुकवण्यात यश आले. खुर्च्या व फर्निचरची मोडतोड केली. आरोपींनी 25 हजार रुपये देण्याचीही मागणी केली.

नेवासा पोलीस ठाण्यात याबाबत अनिल धनवटे सागर धनवटे व एक अनोळखी इसम या तिघांवर भारतीय दंड विधान कलम 307, 384, 385, 323, 427, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या