Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशराजनाधी दिल्ली पुन्हा हादरली; ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप

राजनाधी दिल्ली पुन्हा हादरली; ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप

दिल्ली | Delhi

राजधानी दिल्लीसह परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे समोर आले आहे. या घटनेत अद्यापपर्यंत किती नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली आहे याची माहिती समोर आलेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजली गेली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडची राजधानी डेहराडून, पिथौरागढ आणि अल्मोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. धक्के इतके जोरदार होते की लोकांना ते घर आणि कार्यालया बाहेर पडावं लागलं.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी रात्रीही दिल्लीत भूकंप आला होता. राष्ट्रीय भूकंप मापन विज्ञान केंद्राने सांगितले की, १ जानेवारी रोजी मध्यरात्री १.१९ च्या सुमारास ३.८ तीव्रतेचा भूकंप आला. त्याचे केंद्र हरियाणाच्या झज्जरमध्य होते. त्याची खोली जमिनीखाली ५ किमी आत होती. पण सुदैवाने त्यात कोणत्याही प्रकारची हाणी झाली नाही.

तत्पूर्वी, २९ नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीछआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यावेळी रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता २.५ एवढी होती. दिल्लीच्या पश्चिम क्षेत्रात जमिनीखाली ५ किलोमटीर खोल भूकंपाचे केंद्र होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या