Saturday, May 4, 2024
HomeनाशिकGround Report : मालेगावात 'अशी' बहरली अंजिराची शेती, पाहा व्हिडीओ

Ground Report : मालेगावात ‘अशी’ बहरली अंजिराची शेती, पाहा व्हिडीओ

नाशिक | Nashik

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर डाळिंब (Pomegranate) हे फळबाग पिक (Crop) घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने ‘कसमादे’ पट्ट्याच्या भरभराटीला डाळिंब या पिकाने हातभार लावला आहे. मात्र, जसा काळ बदलत गेला तसा डाळिंब शेतीला तेल्या आणि मार रोगाच्या प्रादुर्भावामुळे आव्हान उभे राहिले आहे…

- Advertisement -

अशा परिस्थितीत येथील शेतकरी (Farmer) हवालदिल झाला असतांनाच आता मालेगाव (Malegaon) जवळील दाभाडी येथील कृषीभूषण शेतकरी अण्णासाहेब देवरे यांनी नवा पर्याय शोधला आहे.

याबाबत माहिती देताना देवरे म्हणाले की, डाळिंबावर तेल्या आणि मररोग आल्यामुळे डाळिंब शेतीत शास्वत राहिली नाही. त्यामुळे डाळिंब शेतीला (Farm) पर्याय म्हणून अंजीर (Fig) शेतीची निवड केली. डाळिंब पिक आता परवडत नसल्याने त्याच्या इतकेच उत्पन्न देणारे पिक म्हणून अंजीर शेतीचा उत्तम पर्याय असल्याचे ते सांगतात.

तसेच एकरी सहा ते आठ टन प्रत्येक बहारानुसार उत्पन्न (Income) मिळत असल्याने बाजारात (Market) मागणी आणि अपेक्षित दर मिळत आहे. त्यामुळे अंजीर लागवडीकडे शेतकऱ्यांनी वळायला हवे असा सल्ला अण्णासाहेब देवरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या