Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराऊत आले बोलले तरीही सेनेचे आंदोलन झालेच नाही

राऊत आले बोलले तरीही सेनेचे आंदोलन झालेच नाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाला निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (shiv sena) पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह बहाल केल्यापासून स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळाला होता.

- Advertisement -

याच दरम्यान तीन दिवसांपूर्वी युवा सेनेच्या वतीने खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या एका वक्तव्याचा निषेध करण्यासाठी द्वारका चौकात जोडे मारो आंदोलन (agiation) देखील झाले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी खा. राऊत यांना नाशिकला (nashik) पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा हि दिला होता. मात्र राऊत नाशिकला येऊन विविध कार्यक्रमांना हजेरी देखील लावली तरीही शिवसेनेने कुठेही आंदोलन केला नसल्यामुळे विविध प्रकारच्या चर्चांना होत आले होते.

शिवसेनेचे आंदोलन (agitation) म्हणजे वेगळ्या स्टाईलने असतो, मात्र आताच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तशी धार दिसून आली नाही. विशेष म्हणजे राऊत यांच्या विरोधात युवा सेनेच्या (yuva sena) एका पदाधिकाऱ्याने पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) तक्रार अर्ज दिले आहे. तर भर चौकात खा. राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील झाले.

शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बद्दल वक्तव्य केल्यामुळे राऊत यांच्या विरोधात विविध नेत्यांनी टीकाही केली होती, मात्र नाशिक मधील युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना सोडले तर इतर पदाधिकाऱ्यांनी याबद्दल साधे निषेध पत्र देखील काढले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक मधील सुमारे दीड डझन माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

यामध्ये काही दिग्गज नेत्यांचा देखील समावेश आहे. प्रवेश करताना मुख्यमंत्र्यांसमोर नाशिकचे माजी नगरसेवकांनी खा. राऊत यांच्यावर जोरदार टीकाही केली होती तर आता राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करूनही नाशिक मधील शिवसेनेचे नेते शांत का होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंदोलनात पक्षाचा एकही मोठा नेता दिसून आला नाही युवा सेनेचे महानगर प्रमुख दिगंबर नाडे (Yuva Sena Metropolitan Chief Digambar Nade) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते.

वेट अँड वॉच

राज्यातील सत्ता संघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. रोज नवनवीन दाव्यांचा युक्तिवाद होत आहे. तर दुसरीकडे नाशिक महापालिका निवडणूक कधी लागणार हे निश्चित नसल्यामुळे दोन्ही गटाचे अनेक नेते वेट अँड वॉच च्या भूमिकेत दिसून येत आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यावर पुन्हा प्रवेशाचा सिलसिला सुरू होण्याची शक्यता नकारता येत नाही.

सुरक्षित वाढ

आपल्या विविध आरोपांनी अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापून देणारे खा. संजय राऊत मंगळवारी सायंकाळी अचानक नाशिकला आले. तर बुधवारी सकाळी ठाणे येथील पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. दरम्यान नाशिक शहर पोलीस दलाच्या वतीने त्यांना अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. पोलिसांचे एक अतिरिक्त वाहन तसेच एक अधिकारीसह काही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राऊत यांच्या सुरक्षेत वाढविण्यात आले होते. त्याचप्रमाणे ज्या हॉटेलमध्ये ते थांबले आहे त्या हॉटेलच्या खोली बाहेर देखील सुरक्षा रक्षक तैनात होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या