Friday, May 17, 2024
Homeनगर'त्या' बुडालेल्या चौथ्या तरुणाचा मृतदेह काढला बाहेर

‘त्या’ बुडालेल्या चौथ्या तरुणाचा मृतदेह काढला बाहेर

देवगड फाटा |वार्ताहर| Devgad Phata

टोका येथे शनिवारी दुपारी पाण्यात पडून मृत्यू (Death) झालेल्या चौथ्या तरुणाचा (नागेश गोरे) मृतदेह (Dead Body) बाहेर काढण्यात रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पथकास यश आले.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री आठवले शिर्डीतून पुन्हा लोकसभा लढणार

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) टोका येथील गोदापात्रात (Godavari) शनिवारी चार तरुण बुडाले. त्यापैकी तिंघाचे मृतदेह सापडल्यानंतर रात्री उशिरा त्यांचे पार्थिव तालुक्यातील पालखेड येथे आणून त्यांच्यावर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.

रविवारी चौथा मृतदेह (Deadbody) सापडल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्यांचा दुःखाचा फुटलेला बांध पाहून उपस्थितांचेही अश्रू अनावर झाले. धार्मिक यात्रेसाठी जाणार्‍या तरुणांचा असा अंत व्हावा. ही बाबच मृतांच्या कुटुंबासह गावकर्‍यांच्या अजूनही पचनी पडायला तयार नाही.

शाळेत जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शंकर पारसनाथ घोडके, बाबासाहेब अशोक गोरे, अक्षय भागीनाथ गोरे व नागेश दिलीप गोरे सर्व रा. पालखेड हे शनिवारी तालुक्यातील पालखेड (Palkhed) येथील चौघेजण पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेसाठी निघाले खरे. परंतु पुढे आपल्याला मृत्यू गाठणार याची कुणाला कल्पना नव्हती.

नागेश गोरे याचा अपवाद वगळता तिघांनाही पोहता येत होते. परंतु गोदेच्या पाण्यापुढे त्यांचे पोहणे टिकाव धरू शकले नाही. दुपारी झालेल्या घटनेनंतर त्यांचे मृतदेह शोधण्यास मोठा विलंब लागला.

अर्थसंकल्प राबवण्यासाठी पैसे कमी पडल्यास कर्डिलेंनी जिल्हा बँकेतून द्यावेत

एकीकडे मुलांच्या मृत्यूने कुटुंबातील सदस्य टाहो फोडत असतानाही मृत्यूनंतर त्यांचा मृतदेहही सापडत नसल्याने सर्वच कासावीस झाले होते. शंकर घोडके याचा अपवाद वगळता अन्य तिघेजण हे एकमेकांचे चुलतभाऊ होते. या तिघांचीही घरची परिस्थिती बेताचीच होती. अक्षय आणि नागेश हे दोघेही अद्याप अविवाहित होते. चौघांनी अजून तिशीही गाठली नव्हती. त्यांच्या या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.

युवकांच्या मृतदेहाचा (Dead Body) शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज मोढवे, कॉन्स्टेबल संजय माने, अशोक कुदळे, रामचंद्र वैद्य, हवालदार श्री. गायकवाड, गोपनीय शाखेचे राहुल केदार आणि कायगाव चे स्थानिक जीवरक्षक दलाचे तरुण तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले.

195 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप प्रभाग रचना 17 मार्चला

- Advertisment -

ताज्या बातम्या