Friday, May 17, 2024
Homeजळगावधक्कादायक ; मुलगा आई-वडीलांची तहान भागवायला विहीरीवर पाणी आणायला गेला अन्‌ घात...

धक्कादायक ; मुलगा आई-वडीलांची तहान भागवायला विहीरीवर पाणी आणायला गेला अन्‌ घात झाला!

पाचोरा – प्रतिनिधी pachora

जामनेर रोड वरील आर्वे फाटा येथे अंतुर्ली येथील वना मोतीराम पाटील हे २० वर्षा पासून आरवे फाटा येथील संघवी डॉक्टर यांच्या शेतात मोल मजूरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. ते नेहमी प्रमाणे शेतात काम करत असतांना वना मोतीराम समाधान उर्फ बाळू वना पाटील, अमोल वना पाटील, आई प्रतिभा वना पाटील रा.अंतुर्ली नं.१ ह.मु.आरवे काम करतांना तहान लागल्याने आई-वडिलांनी मुलगा समाधान (वय २३) यास शेजारील बोहरी यांच्या शेतातील विहीरी वरुन पाणी घेऊन येण्याचे सांगितले.

- Advertisement -

समाधान हा पाणी आणायला गेला, पाणी काढत असतांना तोल गेल्याने तो विहिरित पडला बाजूला काम करत असलेले वडील व भाऊ यांना विहिरित काही तरी पडल्याचा आवाज आल्याबरोबर त्यांनी विहीरीकड़े धाव घेतली त्यांनी पाहिले की मुलगा विहिरित पडल्याचे पाहिल्यावर त्यांनी लगेच विहिरित दोर टाकला परंतु समाधानला दोर पकडण्यात अपयश आले. एकीकडे मुलगा जीव वाचवण्यासाठी मृत्यूशी झुंजत होता तर दुसरीकडे जन्मदाता पिता आपल्या जवान मुलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.

मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणे पडले महागात

वडील कयवया करत होते. बचावासाठी आजूबाजूला कोणाचीच वेळेवर मदत न मिळाल्याने अखेरीस समाधान बुड़ुन तो तळाशी गेला. घटनेची वार्ता आरवे, लोहारी गावात पसरली आणि गावकरी डॉक्टर संघवी यांच्या शेताकड़े धाव घेतली. आरवे येथील एका तड़वी बांधवाने तळाशी बुडालेल्या मुलाला वर काढले. त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तो मृत असल्याचे घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या