Friday, May 17, 2024
Homeक्रीडाIPL-2023 : GT vs PBKS - गुजरातचा पंजाबवर विजय

IPL-2023 : GT vs PBKS – गुजरातचा पंजाबवर विजय

मोहाली | वृत्तसंस्था Mohali

मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आज IPL-2023 क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. यात गुजरातच्या संघाने बाजी मारली. आजच्या सामन्यात शुभमन गिलच्या वैशिष्ट्येपूर्ण फलंदाजीने गुजरातच्या संघाचा विजय झाला.

- Advertisement -

गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघाकडून कर्णधार शिखर धवन व प्रभसिमरन सिंघ सलामीला फलंदाजीस आले. पहिल्या षटकात मोहमद शमीच्या गोलंदाजीवर राशीद खानने प्रभसिमरन सिंघला शून्य धाव संख्येवर झेल बाद करत गुजरातच्या संघाला पहिला धक्का दिला. चौथ्या षटकात जोशुआ लिटलच्या गोलंदाजीवर अल्जारी जोसेफने कर्णधार शिखर धवनला झेल बाद केले. शिखरने ८ चेंडूत ८ धावा केल्या. सलामीला आलेले फलंदाज पाठोपाठ बाद झाल्या नंतर मॅॅट शाॅॅर्टने आक्रमक फलंदाजी केली परंतु सातव्या षटकात राशीद खानने मॅॅट शाॅॅर्टला त्रिफळाचीत केले. मॅॅटने २४ चेंडूत १ षटकार व ६ चौकार लगावत एकूण ३६ धावा केल्या.१० व्या षटकाअंती ३ गडी बाद ७५ धावा अशी स्थिती पंजाबच्या संघाची होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

तेराव्या षटकात मोहित शर्माच्या गोलंदाजीवर वृद्धिमान शहाने जितेश शर्माला झेल बाद केले.जितेश शर्माने २३ चेंडूत २५ धावा केल्या. एकोनाविसाव्या षटकात मोहित शर्माच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने सॅॅम कुरनला झेल बाद केले. सॅॅमने २२ चेंडूत २२ धावा केल्या. डेविड मिलरने शाहरुख खानला धावचीत केले शाहरुख खानने ९ चेंडूत २२ धावा केल्या. २० व्या षटका अखेर पंजाबच्या संघाने ८ गडी बाद १५३ धावा केल्या.

गुजरातच्या संघाकडून वृद्धिमान शहा व शुभमन गिल प्रथम फलंदाजीस आले. वृद्धिमान व शुभमनच्या जोडीने आक्रमक फलंदाजीस सुरवात केली.सामन्याच्या पाचव्या षटकात कासिगो रबाडाच्या गोलंदाजीवर मॅॅट शाॅॅर्टने वृद्धिमान शहाला झेल बाद करत गुजरातच्या संघास पहिला धक्का दिला.वृद्धिमान शहाने १९ चेंडूत ५ चौकार लगावत ३० धावा केल्या. १२व्या षटकात अर्शदीप सिंघच्या गोलंदाजीवर प्रभसिमरन सिंघने साई सुदर्शनला झेल बाद करत गुजरातच्या संघास दुसरा धक्का दिला..साई सुदर्शनने २० चेंडूत १९ धावा केल्या. १५ व्या षटकात हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर सॅॅम कुरनने हार्दिक पंड्याला झेल बाद केले. हार्दिक पंड्याने ११ चेंडूत ८ धावा केल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शेवटच्या षटकातील अटीतटीच्या सामन्यात सॅॅम कुरनने शेवटच्या षटकात शुभमन गिलला त्रिफळाचीत केले. शुभमन गिलने ४९ चेंडूत १ षटकार व ७ चौकार लगावत एकूण ६७ धावा केल्या तर डेविड मिलरने १८ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या.

गुजरातच्या संघाने ६ गडी राखून व एक चेंडू शिल्लक ठेऊन पंजाबच्या संघावर विजय मिळविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या