Friday, May 3, 2024
HomeनाशिकNashik Uday Samant : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे गटाची भूमिका दुटप्पीपणाची; सामंतांचा...

Nashik Uday Samant : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे गटाची भूमिका दुटप्पीपणाची; सामंतांचा हल्लाबोल

नशिक | Nashik

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण विविध मुद्द्यांवरून ढवळून निघाले आहे. अशातच आता बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्वेक्षणाला स्थानिकांकडून विरोध केला जात असून पोलिसांकडून त्यांना अडवले जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भाष्य केले आहे.

- Advertisement -

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूचे कमबॅक

यावेळी सामंत म्हणाले की, सद्यस्थितीत बारसू रिफायनरीबाबत सगळे गैरसमज पसरवले जात असून सकाळपासून सगळी परिस्थिती बघत आहे. तसेच बारसू येथील आंदोलकांना काही उलट सुलट प्रश्न विचारले गेले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी (Police) काही माध्यम प्रतिनिधींना हटविले असेल. मात्र, आम्हाला प्रसार माध्यमांबाबत आदर आहे. तसेच बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प असून यामुळे लाखो लोकांना रोजगार (Employment) मिळणार आहे. त्यामुळे काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यामुळे जालियनवाला बाग होईल, असे त्यांनी म्हटले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

मोठी बातमी! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, असे पत्र दिले होते. आता तेथील आमदार (MLA) रिफायनरी झाली पाहिजे असे म्हणतात, खासदार राऊत नाही व्हायला पाहिजे म्हणतात, खासदार विनायक राऊत म्हणतात वेळ पडली तर उद्धव ठाकरे तेथे येतील. त्यामुळे या सर्वांची दुटप्पी भूमिका उघड झाली असून काहींना राजकारण करायचे होते. पंरतु, त्यांचे मनसुभे धुळीला मिळाली असल्याने सकाळपासून बोंबाबोंब सुरु आहे असे सामंत यांनी म्हटले.

अकरा हजार रुपयांची वीज चोरी; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

तसेच मंत्री सामंत यांना माध्यम प्रतिनिधींनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे सध्या सुट्टीवर आहेत का?, मुख्यमंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे असे कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे.” असे त्यांनी म्हटले. तसेच याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढवली जाणार असून पुढील दीड वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच कायम राहणार असल्याचे सामंतांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या