Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनआपल्या मनोरंजनासाठी लवकरच, 'मराठी पाऊल पडते पुढे'....

आपल्या मनोरंजनासाठी लवकरच, ‘मराठी पाऊल पडते पुढे’….

नाशिक | Nashik

मराठी मालिका विश्वातून थेट बॉलीवूडपटात (Bollywood) झळकलेला मराठमोळा अभिनेता चिराग पाटील (Chirag Patil) आणि ‘गोव्याच्या किनाऱ्यावर…’ रुपेरी वाळूत सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे (Actress Siddhi Patne) यांच्या लव्हस्टोरीने (love story) सजलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सिनेमा 5 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने चिराग आणि सिद्धी हे प्रथमच एकत्र आले आहेत.

- Advertisement -

नुकताच ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांच्या हस्ते आणि मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नाशिक येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेला मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष संजय मोरे आणि इतर दिग्गज बांधकाम व्यावसायिक सदस्य उपस्थित होते.

संगीतकार समीर खोले य़ांनी संगीतबद्ध केलेली पाचही गाणी वेगळ्या धाटणीची आहेत. स्वप्निल बांदोडकर आणि उद्योन्मुख गायिका निमिषा बाविस्कर यांनी गायलेल्या ‘तुझ्यात हारणे’ ह्या प्रेम गीताचे बोल हे पालघरच्या टोलनाक्यावर नोकरी करणारा कवी कृपेश पाटील यांनी लिहिले आहेत.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! फडणवीस-शिंदेंमध्ये पदाची अदलाबदली होणार?

मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पाहायला मिळणारे अहिराणी भाषेतील ‘छोरा अनेर काठ ना’ हे गाणे कवी व गायक प्रविण माळी (Singer Pravin Mali) यांनी गायले आहे. गीतकार कवीकिरण पाटील यांनी शब्दबद्ध केलेले धनराज सरतापे यांनी गायलेले ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हे शीर्षकगीत प्रत्येक मराठी मनाला उभारी देणारे आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात अजित पवार यांनी मांडली भूमिका; म्हणाले दंडुकेशाहीनं…

कवयित्री रेश्मा कारखानीस यांनी ह्या चित्रपटासाठी दोन गाणी लिहीली आहेत. मयुरा खोले यांनी गायलेले ‘कातिलाना’ हे आयटम साँग आणि धनराज सरतापे आणि निमिषा बाविस्कर यांनी गायलेले शेतकरी गीत मराठी माणसाला संस्कारांची जाणीव करून देणारे आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अकात फिल्म्सचे संचालक चंद्रकांत विसपुते हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. स्वप्नील मयेकर लिखित-दिग्दर्शित तसेच चिराग पाटील, सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये बघायला मिळणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या