Friday, May 17, 2024
Homeजळगावअमळनेर हादरले : आपसातील वादातून एकविशीतील दोन तरुणांचा खून

अमळनेर हादरले : आपसातील वादातून एकविशीतील दोन तरुणांचा खून

अमळनेर : Amalner

तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनामध्ये तरुणांच्या आपसातील वादातून (argument)  एकविशीतील दोन  तरुणांचा (youth) खून (murder) झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान २४ तासाच्या आत रात्रभर फिरून दोन्ही गुन्ह्यातील सहा आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.    

- Advertisement -

धुळे-दादर एक्सप्रेस रेल्वेची अधिसूचना जारी

 सावखेडा येथे नाना मंगलसिंग बारेला वय २१  याने  डेबूजी सुरसिंग बारेला  वय २१ ह मु सावखेडा मूळ रा किरमोहा ता सेंधवा मध्यप्रदेश याला २४ रोजी सायंकाळी काठीने मारहाण केलेली होती. त्याचा राग मनात ठेवून डेबूजी याने २५ रोजी पहाटे साडे बारा वाजेच्या सुमारास  कुऱ्हाड घेऊन रतन मल्लू वैदू याच्या घराजवळ कुऱ्हाडीने नाना च्या डोक्यात वार करून मारून टाकले. नाना जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला होता. आणि तशीच रक्ताने माखलेली कुर्हाड घेऊन दिनेश संतोष पाटील याला माहिती दिली. घटनेची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक वाकोडे यांना कळवताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ ,हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव , पो कॉ राहुल पाटील यांना सावखेडा रवाना केल्याने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी डेबूजी याला ताब्यात घेण्यात आले आहे. दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.

 दुसऱ्या घटनेत दाजीबा नगर भागात राहुल नाना सरोदे ,रोहित चेतन सरोदे ,कृष्णा सरोदे ,अर्जुन पारधी हे  घरच्या गच्चीवर जोरात  गाणे  वाजवत होते म्हणून त्यांना दीपक राजू भिल  बोलायला  गेला असता ते दीपक ला मारू लागले. घरी येऊन अक्षय ला घटना सांगितली असता अक्षय जाब विचारायला गेला त्यावेळी रोहित चेतन सरोदे याने  अक्षय राजू भिल वय २२ याला  पोटात चाकू मारला. व दिपकला रोहित च्या आई नीताने बांबू मारला तर राहुल च्या आई आरतीने लोखंडी रॉड मारून जखमी केले. 

 त्याला धुळे येथे उपचारसाठी रवाना केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा भाऊ गंभीर जखमी आहे.  दरम्यान दोन महिन्यांपूर्वी दोघांच्या एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल झाल्या होत्या. 

दरम्यान  मारहाण करणारे आरोपी रोहित चेतन सरोदे   वय १९ ,राहुल नाना सरोदे  वय २३  ,अर्जुन नाना सरोदे वय २५ ,नीता चेतन सरोदे वय ४५  याना अक्षय मयत झाल्याचे कळताच  ते  धुळ्याला पळून गेले होते. 

प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास  वाकोडे यांच्या आदेशाने  सहाय्यक  पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी ,पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे  पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे  ,शरद पाटील , रवी पाटील ,दीपक माळी ,  सूर्यकांत साळुंखे ,  सिद्धांत शिसोदे  यांनी धुळ्यात चितोडगड परिसरात आरोपी असल्याची माहिती घेऊन त्यांना तेथून  ताब्यात घेतले आहे.

तर दुसरी महिला आरोपी आरती नाना   सरोदे वय ४८ ही महिला अमळनेरात असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे ,सुनील हटकर ,कपिल पाटील यांनी तिला पकडून आणले. डी वाय एस पी राकेश जाधव यांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे.

मयत तरूणाच्या नातेवाईक रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मारेकऱ्यांना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. यावेळी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या