Friday, May 3, 2024
Homeब्लॉगव्यवसाय निर्मिती

व्यवसाय निर्मिती

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…

पदवी मिळेपर्यंत हळूहळू सुरू केलेला व्यवसाय बुद्धिमत्तेच्या क्षमतेवर उभारी धरू शकेल. अनुभवाने व्यवसायात स्थिरताही येईल. आपली मुले व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावर काही सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःकडे नोकरी देऊ शकतील. आजच्या पिढीचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. आत्मनिर्भर राहण्याच्या मनोभूमिकेतून ते भविष्यकाळात धडाडीने यश संपादन करतील. आपण सर्वांनी त्यांच्या या गौरवपूर्ण कार्यात सहभागी होऊन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला हव्यात. एकदा व्यवसायातील चातुर्य त्यांच्या लक्षात आले की यशाची एक एक पायरी चढत स्वतःची कंपनीही काढू शकतील. हे सर्व ते कर्तबगारीने करू शकतील कारण त्यांना समाजात खरेपणाने वागण्याची गुरुकिल्ली तुम्हीच त्यांना दिली आहे. सुजाण पालकांची मुले समोरच्यांना फसवत नाहीत व यातच त्यांच्या जीवनातील सफलता असते.

आजचे जग कॉम्प्युटर, लॅपटॅाप नि मोबाईलचे आहे. पालकांनीही या जगात मुलांबरोबर राहायला पाहिजे. जगातील अनेक प्रकारची माहिती या आधुनिक उपकरणांमध्ये मिळते. या गोष्टी उद्योग जगतात म्हणजेच व्यवसाय क्षेत्रात गाईडप्रमाणे उत्कृष्ट काम करतात. भविष्यात मुलाने धडाडीने स्वतःची कंपनी काढली तर मग ती कोणत्याही उद्योगावर आधारित असो पूर्ण कार्यक्षमतेने काम केले तर प्रयत्नांनी मुले यशाचे शिखर गाठू शकतील. कार्यतत्पर स्टाफ हाताशी घेतला तर बरीच महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर विश्वासाने सोपवता येते. बॉसची निर्णय क्षमता व स्टाफची आकलन क्षमता यांच्या एकत्रित कार्याने म्हणजेच सहकार्याने व्यवसाय प्रगतिपथावर जातो. त्यामुळे आपली मुले शिकली म्हणजे त्यांनी नोकरीच केली पाहिजे असे नाही तर अनेक व्यवसायांची दारे त्यांच्यासाठी खुली आहेत.

- Advertisement -

मुले ग्रामीण भागातील असतील तर दुग्धव्यवसाय विकसित करून स्वतःची डेअरी ते काढू शकतात. चांगल्या प्रतीच्या फळांच्या बागा लावून त्या फळांवर आधारित व्यवसाय करून उत्तम दर्जाची फळे परदेशातही निर्यात करू शकतील. फळांना बाहेरील देशांत चांगली मागणी आहे व भावही चांगला मिळतो. आज सर्वचजण चांगल्या आहारासाठी जागरुक आहेत. त्यामुळे फळांचे महत्त्व अधिक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या रोपांची निर्मिती आपल्या शेतात केली तर नर्सरीचा चांगला व्यवसाय सुरू करता येतो. अशा खूप व्यवसायांचे पर्याय नोकरीला आहेत. पालकांनो, तुम्हीही आपल्या मुलांच्या व्यवसायात सामील व्हा. व्यवसाय मुलाचा एकट्याचा नाही तर घरातील सर्वच जबाबदार व्यक्तींचा आहे. घरातील सर्वांनीच हातात हात गुंफून एकीच्या बळावर काम केले तर उत्कृष्ट व्यवसाय होऊ शकतो, हे जगाला आपल्या उदाहरणावरून दाखवून द्या.

क्रमशः

- Advertisment -

ताज्या बातम्या