Friday, May 3, 2024
Homeनगरप्रशासकाची गैरहजेरी; पुणतांब्याची ग्रामसभा तहकूब

प्रशासकाची गैरहजेरी; पुणतांब्याची ग्रामसभा तहकूब

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये तहसीलदार राहाता यांच्या आदेशानुसार काल बुधवारी 11 वाजता येथील ग्राम सचिवालयाच्या सभागृहात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षण कामी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु विशेष ग्रामसभेला पुणतांबा ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेले प्रशासक श्री. गायकवाड अनुपस्थित असल्याने ग्रामस्थांनी एकमताने विशेष ग्रामसभा तहकूब केली.

- Advertisement -

विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती, जमाती महिलावर्ग, सर्वसाधारण महिला आरक्षण निकाली काढणे कामी ग्रामविकास अधिकारी कडलक, कृषी सहाय्यक लॉट अधिकारी विनय भाकरे, तलाठी भरती लोखंडे यांच्या उपस्थितीत ग्रामसभेत सुरुवात झाली.

तलाठी भारती लोखंडे व विनय भाकरे यांनी एकूण लोकसंख्या व प्रभाग रचनेनुसार आरक्षण याचे वाचन केले परंतु उपस्थित ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने सदर ग्रामसभा ही प्रशासक उपस्थित असल्याशिवाय घेण्यात येऊ नये, अशी मागणी सर्व संमतीने करण्यात आली व त्यास मंजुरी देऊन ग्रामसभा तहकूब करण्यात आली.

या विशेष ग्रामसभेप्रसंगी ग्रामविकास अधिकारी कडलक, तलाठी भारती लोखंडे, कृषी सहाय्यक विनय भाकरे, माजी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, मुरलीधर थोरात, महेश चव्हाण, गोदामाई प्रतिष्ठान अध्यक्ष विजय धनवटे, भाजपचे सरचिटणीस सुभाष वहाडणे, सर्जेराव जाधव, सुनील थोरात, सदाशिव वहाटोळे, प्रताप वहाडणे, संभाजी गमे, प्रशांत राऊत, योगेश घाटकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या