Monday, May 20, 2024
Homeजळगावरस्त्यावर फेकली लाखो रूपयांची औषधी

रस्त्यावर फेकली लाखो रूपयांची औषधी

भुसावळ । प्रतिनिधी bhusawal

महाराष्ट्र (maharastra) सरकार प्राथमिक आरोग्य केंद्रावर (Primary Health Centres) गोरगरिब व गरजु रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणात औषधी (Medicinal) उपलब्ध करून देत असते. मात्र तालुक्यातील खंडाळा ते शिंदी शिव रस्त्यावर परिसरातील आरोग्य केंद्राकडून अशी लाखों रूपयांची औषधी फेकण्यात आली असून या मागचे कारण काय? ही औषधी रूग्णांना न देता ती कोणी फेकली याबाबत चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिक व रूग्णांनी केली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील खंडाळा-शिंदी शिव रस्त्यावर महाराष्ट्र राज्य सरकारने मोफत दिल्या जाणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील ओआरएसचे शेकडो सीलबंद पाकीट, आयरॉन फॉलीक अ‍ॅसिड सिरप आयपीच्या पाचशेच्या वर सिलबंद बॉटल्स, कंडोमचे पाकीटे, मास्क, टॅब्लेट आयपी चे शेकडो पाकीट, इंजेक्शन, खंडाळा-शिंदी या शेतीच्या दोन किलोमीटर आत शिव रस्त्यावर शेताच्या चारित व पुलाखाली खुलेआम फेकले असून त्यात 2021-22 व चालू वर्षाचे अजून ही मुदत असलेले व मुदत संपलेल्या लाखो रुपयांचे औषधी फेकल्या आहे.

या प्रकारच्या मागील खरा सूत्रधार कोण आणि नेमका फेकणारा कोण? तालुक्यातील आजूबाजूच्या प्राथमिक आरोग्य व उप-आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि जे कोणी यात सहभागी व दोषी असतील त्यांची सखोल चौकशी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी करावी व कर्तव्यास कसूर केल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक व रूग्णांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या